नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात पोहचले आरोग्य संचालक, गावकऱ्यांना सुखद धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 03:51 PM2022-05-13T15:51:11+5:302022-05-13T16:11:50+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य संचालकांचे पथक पोहोचल्याने या भागातील आदिवासींमध्ये हे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य संचालकांच्या पथकाने ह्या भागात दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

A team of health director visited the Naxal-affected area binagunda | नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात पोहचले आरोग्य संचालक, गावकऱ्यांना सुखद धक्का

नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात पोहचले आरोग्य संचालक, गावकऱ्यांना सुखद धक्का

Next

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील खरतड डोंगरावर भागात पायदळी प्रवास करून भामरागड तालुक्याच्या बिनागुंडा पथक पोहोचले. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य संचालकांचे पथक पोहोचल्याने या भागातील आदिवासींमध्ये हे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य संचालकांच्या पथकाने ह्या भागात दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

आपला जीव धोक्यात घालून पायदळी प्रवास करून पुणे येथील आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील उचलून व आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, नागपुरचे उपसंचालक डॉ. जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यातील पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी खंडतर प्रवास करून बिनागुंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात हे पथक पोहोचले.

दुर्गम व ग्रामीण भागात स्वच्छता राहिल्यास रोगांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे स्वच्छतेवर लक्ष देत मलेरीयावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते पाऊल पावसाळी आधी सर्व प्रशासनाला अलर्ट करणार, अशी महिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी यावेळी दिली.

मलेरियाची समस्या गंभीर

मलेरियाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात वाढत असल्यामुळे मलेरियावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सर्व अधिकाऱ्यांसोबत येथे संवाद साधला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नक्षलग्रस्त भागात असलेल्या अनेक समस्या आरोग्य सचिवांच्या समोर मांडल्या.

बिनागुंडा परिसरात पावसाळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना पोहोचणे अशक्य होते. तसेच या भागात पावसाळ्यात मलेरियाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात होते. यासाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली.

Web Title: A team of health director visited the Naxal-affected area binagunda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.