अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब; आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By दिलीप दहेलकर | Published: January 31, 2024 07:06 PM2024-01-31T19:06:07+5:302024-01-31T19:06:43+5:30

कुटुंबियांना काहीही न सांगता घरातून निघुन गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही.

A teenage girl mysteriously disappears A case has been registered at Armory Police Station | अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब; आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या झाली गायब; आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गडचिराेली: कुटुंबियांना काहीही न सांगता घरातून निघुन गेलेली १६ वर्षीय मुलगी सायंकाळी परतली नाही. सर्वत्र शोधाशोध व नातेवाईकाकडे चौकशी करूनही मुलगी सापडली नाही, त्यामुळे तिच्या वडीलांनी थेट आरमाेरी पाेलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. 

आरमाेरी पाेलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावातील इयता अकरावीला शिकणारी अल्पवयीन मुलगी २२ जानेवारी राेजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजताच्या दरम्यान घरच्यांना काहीही न सांगता घरातुन निघुन गेली. ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईवडील व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती सापडली नाही. घरी परत येईल, या आशेवर कुटुंबियांनी चार दिवस प्रतिक्षा केली. मात्र मुलीचा शाेध न लागल्याने अखेर वडीलांनी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कुणीतरी अज्ञात इसमाने मुलीला फुस लाऊन पळवून नेले असल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पाेलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलगी व अज्ञात आरोपी कुणाला सापडल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आरमाेरी पाेलिसांनी केले आहे.

तक्रारीवरून आरमाेरी पोलिसांनी २८ जानेवारी राेजी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहीती पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.

गावालगतचा मुलगाही गायब?
गायब झालेली अल्पवयीन मुलगी ही अकरावीला शिकत असून ती गावानजीकच्या शाळेत जाते. तिच्या गावालगतच्या एका गावातील मुलासाेबत तिचे सूत जुळले हाेते, सदर प्रेमप्रकरणातून दाेघेही गायब असल्याची खमंग चर्चा परीसरात आहे.

Web Title: A teenage girl mysteriously disappears A case has been registered at Armory Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.