शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार, हिरापूरच्या शेतशिवारातील घटना

By गेापाल लाजुरकर | Published: November 24, 2023 09:52 PM2023-11-24T21:52:21+5:302023-11-24T21:53:07+5:30

इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लाेंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगाेटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात हाेत्या.

A tiger killed a woman going to the farm, an incident in Shetshiwar of Hirapur | शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार, हिरापूरच्या शेतशिवारातील घटना

शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार, हिरापूरच्या शेतशिवारातील घटना

 

गडचिरोली : धान बांधणीनंतर शेतातील शिल्लक लाेंबी वेचण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शुक्रवार २४ नाेव्हेंबर राेजी दुपारच्या सुमारास हिरापूर येथील कंपार्टमेंट नं. १६६ मधील शेतशिवारात घडली. इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५) रा. हिरापूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लाेंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगाेटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात हाेत्या. परंतु याच वेळी रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला करून त्यांना झुडपात फरफटत नेले. सायंकाळ हाेऊनही इंदिराबाई घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शाेध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शेताच्या दिशेने धाव घेतली व शाेध सुरू केला. तेव्हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इंदिराबाई यांचा मृतदेह पाथरगोट्याजवळ आढळला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व इंदिराबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, सुना, नातवंड आहेत.

धाेका पत्करून शेतीची कामे
हिरापूर परिसरात चार ते पाच वाघांचा वावर आहे. याच भागात अनेकांची शेती आहे. सध्या धान कापणी, बांधणी व मळणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाघाच्या दहशतीत धाेका पत्करून शेतीची कामे करावी लागत आहेत.

 

Web Title: A tiger killed a woman going to the farm, an incident in Shetshiwar of Hirapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.