अभाविपच्या ग्रामरक्षक अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:31+5:302021-06-26T04:25:31+5:30

देसाईगंज : अभाविपच्या वतीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आम्ही ग्राम रक्षक हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ...

Abhavip's Gram Rakshak Abhiyan begins | अभाविपच्या ग्रामरक्षक अभियानास सुरुवात

अभाविपच्या ग्रामरक्षक अभियानास सुरुवात

Next

देसाईगंज : अभाविपच्या वतीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आम्ही ग्राम रक्षक हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विविध शहरी भागात प्रामुख्याने अभाविपचे कार्यकर्ते हे आरोग्यसेवा या सोबतच थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन तपासणी, व लसीकरणाबाबत जनजागृती सुरू आहे. या अभियानाची सुरुवात वडसा तालुक्यातील शंकरपूर या गावापासून करण्यात आली.

येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा संभावित धोका जाणून घेता ग्रामीण भागात असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, १०० टक्के लसीकरण करणे व यातील लक्षणे आढळून आल्यास योग्य वेळी आरोग्य तपासणी करून घेणे व कोरोनाला आपल्या गावापासून व आपला शहरापासून दूर ठेवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यात जिल्हाभरातील जवळपास ७० कार्यकर्ते हे आपापल्या ठिकाणी अभियान करणार आहे.

या अभियानाची सुरुवात वडसा तालुक्यातील शंकरपूर या गावापासून सुरू करून लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या अभियानात गावातील नागरिकानी सुध्दा सहकार्य करावे व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पराभूत करण्यास मदत करावी, असे प्रतिपादन अभाविपचे वडसा भाग संयोजक अक्षय कोकोडे यांनी केले. यावेळी नितेश मराठे, शुभम मारसिंगे, यश गुरनुले व संघटन मंत्री शक्ती केराम उपस्थित होते.

===Photopath===

250621\img-20210625-wa0017.jpg

===Caption===

ग्रामरक्षक

Web Title: Abhavip's Gram Rakshak Abhiyan begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.