वनश्री महाविद्यालयाच्या रासेयाे पथकाचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:33 AM2021-01-21T04:33:14+5:302021-01-21T04:33:14+5:30

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कुठेही थुंकण्याची सवय किती घातक आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी भारत सरकारकडून 'स्पिट फ्री इंडिया' ...

The absence of the Raseya team of Vanashree College | वनश्री महाविद्यालयाच्या रासेयाे पथकाचा गाैरव

वनश्री महाविद्यालयाच्या रासेयाे पथकाचा गाैरव

Next

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कुठेही थुंकण्याची सवय किती घातक आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी भारत सरकारकडून 'स्पिट फ्री इंडिया' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात ज्या रासेयो पथकांनी नोंदणी केली त्यांना त्यांच्या महाविद्यालयाची स्वतंत्र लिंक तयार करून देण्यात आली होती. या लिंकवर एक चित्रफित दाखवून त्यावर काही प्रश्न विचारले जात होते आणि त्यांची योग्य उत्तरे देऊन शपथ घेतल्यानंतर सहभागींना डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त होत होते. अशा प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या यशस्वी सहभागींची संख्या १०००, २०००, ३००० झाल्यानंतर अनुक्रमे कांस्य, रजत व सुवर्ण पदक तथा प्रमाणपत्र प्राप्त होणार होते. तसेच ५००० हून अधिक सहभागींना यात जोडल्यानंतर सर्वोच्च प्लॅटिनम मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येणार होते. त्यानुसार वनश्री महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांनी अभियान राबविले. २७ डिसेंबर २०२० पर्यंत ५१२० लोकांना या अभियानाशी जोडण्याची किमया साधली. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी यांना डिजिटल प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. यशाबद्दल संस्थाध्यक्ष बाबासाहेब भातकुलकर यांनी काैतुक केले.

Web Title: The absence of the Raseya team of Vanashree College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.