सभापतींच्या भेटीत १० कर्मचारी अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:31 PM2019-06-10T21:31:58+5:302019-06-10T21:32:27+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता सिरोंचा पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान ३२ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता सिरोंचा पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान ३२ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित होते.
पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी जनगाम यांना प्राप्त झाल्या होत्या. याची शहानिशा करण्यासाठी जनगाम यांनी सोमवारी दुपारी दीड वाजता पंचायत समिती कार्यालयाला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान पंचायत समितीमधील एकूण ३२ कर्मचाऱ्यांपैकी १० अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काही विस्तार अधिकाऱ्यांनी हलचल रजिस्टरवर दौºयावर जात असल्याची नोंद केली. प्रत्यक्षात मात्र ते दौºयावर गेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दुसरा शनिवार व रविवारच्या सुटीच्या वेळी कर्मचारी शनिवारी दुपारीच कार्यालय सोडतात. सोमवारी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचतात. अनुपस्थितीत असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले जाईल, अशी माहिती जनगाम यांनी दिली आहे. येथील बीडीओचा प्रभार पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पदभार आहे. याचा गैरफायदा कर्मचाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे, असा आरोप जनगाम यांनी केला आहे.
अनुपस्थितांची नावे
कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.एन. मेश्राम, पंचायत विस्तार अधिकारी जी. बी. माकडे, कृषी विस्तार अधिकारी जी. टी. पोरटे, आरोग्य विस्तार अधिकारी एम.बी. कुंभारे, आरोग्य पर्यवेक्षक व्ही.व्ही. कोत्तावार, अभियांत्रिकी सहायक पी.एल. नागरगोजे, कनिष्ठ सहायक जी. टी. वासनिक, एन. एम. कत्रोजवार, एन. एस. किरणापुरे हे अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आढळले.