गतिराेधक उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:35 AM2021-03-06T04:35:07+5:302021-03-06T04:35:07+5:30
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वेगाने दुचाकी, चारचाकी वाहनांसह ...
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वेगाने दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते. त्यामुळे नागमाता मंदिराजवळ गतिरोधक उभारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याचे अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
अहेरी : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक, लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. परिणामी वेतनाला विलंब होतो.
दुधाचे उत्पादन वाढीसाठी योजना राबवा
कोरची : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ८० पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र यातील अनेक संस्था बंद पडल्या आहेत.
निकतवाडा मार्गावर गतिरोधक फलकाचा अभाव
घोट : घोट-रेगडी-विकासपल्ली मार्गाला जोडणाऱ्या निकतवाडा-नवेगाव या मार्गावर गतिरोधक आहे. मात्र गतिरोधक फलक नाही. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मागणी करूनही संबंधित विभागाने या ठिकाणी गतिरोधक फलक लावलेला नाही.
खर्रा पन्नीवर बंदी आणण्याची मागणी
जोगीसाखरा : जोगीसाखरा गावासह आरमोरी तालुक्यात खर्रा घोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पन्नीचा वापर केला जातो. या पन्या रस्त्यावर फेकून दिल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरूस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
घोट-रेखेगाव मार्गाची दुरवस्था
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. हा मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. मार्गावर अनेक किरकोळ अपघात यापूर्वी घडले आहेत.
शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरूस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.