आष्टी तालुका निर्मितीसाठी शासनाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 08:55 PM2017-12-28T20:55:29+5:302017-12-28T20:55:45+5:30

सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे.

Accept the government for creation of Ashti Taluka | आष्टी तालुका निर्मितीसाठी शासनाला साकडे

आष्टी तालुका निर्मितीसाठी शासनाला साकडे

Next
ठळक मुद्देनिर्णय व्हावा : जि.प. सदस्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : सिरोंचा-चंद्रपूर व सिरोंचा-गडचिरोलीला जोडणारे आष्टी हे मध्यवर्ती केंद्र असूनही विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीयदृष्टीने आष्टी तालुक्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, चामोर्शी तालुका निर्माण झाला तेव्हापासून आष्टी तालुका व्हावा, अशी मागणी होती. आष्टीपासून चामोर्शीचे अंतर ३५ किमी असल्याने तहसील, न्यायालय व इतर कामासाठी चामोर्शीला जाणे शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे. गरीब व सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आष्टी येथे शाळा, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय तसेच तालुक्यातील पहिले अनुदानित महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, पेट्रोलपंप, जि.प. बांधकाम, सिंचाई व सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये असून सर्व सोयीसुविधायुक्त विश्रामगृह आहे.
अनखोडा, गणपूर (रै.), इल्लूर, ठाकरी, मार्र्कंडा (कं.), येनापूर, कोनसरी आदी मोठी गावे या भागात समाविष्ट आहेत. इल्लूर पेपरमिल जवळ असून भौगोलिक पार्श्वभूमी आष्टीला लाभली आहे. भविष्यात होत असलेल्या हायवेचे आष्टी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे सोयीसाठी आष्टी तालुक्याची निर्मिती करावी, असे पंदिलवार यांनी म्हटले आहे.

Web Title: Accept the government for creation of Ashti Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.