भुयारी मार्ग अतिक्रमणाने अपघाताचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:38+5:302021-03-06T04:34:38+5:30
देसाईगंज : कुरखेडा मुख्य मार्गावर अगदी भुयारी पुलाच्या दर्शनी भागात काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे कुरखेडाकडून ...
देसाईगंज : कुरखेडा मुख्य मार्गावर अगदी भुयारी पुलाच्या दर्शनी भागात काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यामुळे कुरखेडाकडून बाजार परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे.
काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक ट्रक उलटला. या ठिकाणी असलेले अतिक्रमण या अपघातास जबाबदार असल्याचे बाेलले जात आहे. देसाईगंज शहर दाेन भागांत विभागले गेले आहे. मार्केट एरियामधून शहरात प्रवेश करताना मध्यभागी रेल्वे आहे. या ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या मार्गावरून वाहनांची रात्रंदिवस वर्दळ राहते. मुख्य मार्गावर काही दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. भुयारी पुलातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी दुकानांचे अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटण्यात आली आहेत. हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे. स्थानिक नगरपालिका प्रशासनाने यावर नियाेजन करून उपाययाेजना करावी, अशी मागणी शहरातील वाहनधारक करीत आहेत.