आमदार होळी यांच्या वाहनाला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 10:57 PM2022-10-06T22:57:36+5:302022-10-06T22:58:14+5:30

डॉ. होळी आपल्या वाहनाने (एम.एच. ३३, एए ७९९९) दसऱ्याच्या दिवशी गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत होते. गाढवी नदीच्या अरूंद पुलावरून ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकलाच धडक बसली. यात दुचाकीस्वार प्रणय सुधाकर मडावी (रा. रायपूर, ता. चामोर्शी) हा ट्रकच्या खाली शिरला गेला. 

Accident to MLA Holi's vehicle | आमदार होळी यांच्या वाहनाला अपघात

आमदार होळी यांच्या वाहनाला अपघात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी हे आपल्या खासगी वाहनाने गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत असताना ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या ट्रकला धडक बसली. यावेळी विरूद्ध दिशेने येणारे दुचाकी वाहन अनियंत्रित होऊन दोन्ही वाहनांची त्याला धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी झाला.   
प्राप्त माहितीनुसार, डॉ. होळी आपल्या वाहनाने (एम.एच. ३३, एए ७९९९) दसऱ्याच्या दिवशी गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत होते. गाढवी नदीच्या अरूंद पुलावरून ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकलाच धडक बसली. यात दुचाकीस्वार प्रणय सुधाकर मडावी (रा. रायपूर, ता. चामोर्शी) हा ट्रकच्या खाली शिरला गेला. 

बाईक पडली नदीपात्रात
-    गाढवी नदीच्या अरुंद पुलावर तिसरे वाहन जात नसल्याचे समजताच दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडले. त्यामुळे त्याने आपली बाईक ट्रकच्या बाजूने वळविली. त्यामुळे ट्रक व कारची बाईकला धडक बसून ती बाईक नदीपात्रात कोसळली. 
-    पण बाईकवरील प्रणय मडावी हा बाईकवरून उसळून ट्रकच्या दोन्ही चाकांच्या मध्ये शिरला. त्याला तत्काळ आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. त्यानंतर त्याला ब्रह्मपुरीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. अधिक तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Accident to MLA Holi's vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.