भंगार वाहनाने अपघाताचा धोका
By admin | Published: September 18, 2015 01:17 AM2015-09-18T01:17:53+5:302015-09-18T01:17:53+5:30
आरमोरी मुख्य मार्गाच्या अगदी बाजुला प्रवासी वाहन मागील दोन वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहे.
उचलण्याची मागणी : दोन वर्षांपासून पडून
देसाईगंज : आरमोरी मुख्य मार्गाच्या अगदी बाजुला प्रवासी वाहन मागील दोन वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहे. सदर वाहनाकडे ये-जा करणाऱ्यांचे लक्ष जात असल्याने या ठिकाणी आजपर्यंत अनेक लहान, मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे सदर वाहन हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वन विभागाने आरमोरी मार्गावर २० एकरात जैवविविधता उद्यान उभारले आहे. या उद्यानात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जैवविविधता उद्यानाच्या मागच्या बाजुला प्रवासी वाहन भंगार अवस्थेत पडले आहे. सदर वाहन नेमके कुणाचे आहे, याच ठिकाणी का ठेवण्यात आले, याबाबतची माहिती कुणालाही नाही. मात्र सदर वाहनाकडे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांचे एकदम लक्ष जाते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. पोलिसांनी वाहन मालकाचा पत्ता लावून वाहन येथून हटविण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)