एलचिल-तोंदेल दरम्यान अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:31 AM2018-10-10T01:31:29+5:302018-10-10T01:31:49+5:30

एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील एलचिल ते तोंदेल या पाच किमी मार्गावर डोंगर असून नागमोडी वळण आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ७ आॅक्टोबर रोजी लोहदगड घेऊन जाणारा ट्रक उलटला.

Accidents have increased during Elchil-Tondel | एलचिल-तोंदेल दरम्यान अपघात वाढले

एलचिल-तोंदेल दरम्यान अपघात वाढले

Next
ठळक मुद्देएटापल्ली-आलापल्ली मार्ग : लोहखनिजाची होते वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील एलचिल ते तोंदेल या पाच किमी मार्गावर डोंगर असून नागमोडी वळण आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ७ आॅक्टोबर रोजी लोहदगड घेऊन जाणारा ट्रक उलटला. या ठिकाणी लहान, मोठे अपघात नेहमीच घडत आहेत.
आलापल्ली ते एटापल्ली हा २९ किमीचा मार्ग आहे. एटापल्लीपासून ते आलापल्लीपर्यंत घनदाट जंगल आहे. सुरजागड पहाडावरून लोहखनिज उत्खननाच्या कामाला सुरूवात झाल्यापासून या मार्गावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. लोहखनिजाचे शेकडो ट्रक या मार्गावरून दरदिवशी धावत राहतात. त्यामुळे मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे सुध्दा पडले आहेत. एलचिल ते तोंदेल गावादरम्यानचा रस्ता अतिशय धोकादायक आहे. डोंगरावरून रस्ता काढण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उतार आहेत. नागमोडी वळण असल्याने वाहन नियंत्रणात राहत नाही. सोबतच या ठिकाणी खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकाचा नियंत्रण सुटते व वाहन उलटते. अशा अनेक घडल्या आहेत. ७ आॅक्टोबर रोजी झालेल्या अपघातात वाहनचालक जखमी झाला आहे. या ठिकाणी अपघात होऊन काही नागरिकांचा मृत्यू सुध्दा झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Accidents have increased during Elchil-Tondel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात