लाडपागे समितीनुसार सफाई कामगार नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:55 PM2017-09-15T22:55:09+5:302017-09-15T22:55:26+5:30
पागेलाड समितीच्या निर्देशांची अंमलबजावणी करून सफाई कामगारांची नेमणूक करावी, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पागेलाड समितीच्या निर्देशांची अंमलबजावणी करून सफाई कामगारांची नेमणूक करावी, सफाई कामगारांना अतिरिक्त कामाचा त्रास देऊ नये, सफाई कामगारांना ४ फेब्रुवारी २०१७ च्या आयुक्तांच्या आदेशानुसार प्रतिमाह ८ हजार ४३८ रूपये वेतन देण्यात यावे, असे निर्देश देसाईगंज व गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकाºयांना दिले आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी ते गडचिरोली जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. याप्रसंगी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने रामूजी पवार यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सफाई कामगारांना सफाईचे साहित्य, गणवेश व आवश्यक ती सुरक्षा प्रदान करणे हे कंत्राटदाराचे काम आहे.
या सर्व सुविधा पुरविल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराचे बिल पास करण्यात येऊ नये, डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्ष पूर्ण झालेल्या सफाई कामगारांच्या पात्र वारसदारांना मोफत घरे देण्याची कारवाई करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश मुख्याधिकाºयांना दिले आहेत. सफाई कामगारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता तक्रारीनुसार चौकशी करावी, असे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांना दिले असल्याची माहिती कार्यक्रमादरम्यान रामूजी पवार यांनी दिली.
कार्यक्रमाला संघटनेचे महामंत्री जयसिंग कच्छवाह, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, सामाजिक कार्यकर्ते सतीश सिरसवान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो उपस्थित होते. संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन रामू पवार यांना देण्यात आले.