आईने दिली चिथावणी अन् 'ताे' बनला हैवान; फावड्याने मारहाण करून तरुणाला दगडाने ठेचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 12:30 PM2022-07-09T12:30:57+5:302022-07-09T12:36:01+5:30
आरोपींची कारागृहात रवानगी
गडचिराेली : तालुक्यातील पुलखल येथे ५ जून राेजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणात मृतक कैलाश रामकृष्ण मेश्राम व आराेपी नरेश देवराव गेडेकर यांच्यात भांडण सुरू असताना आराेपी नरेशची आई ललिता ही नरेशला चिथावणी देत ‘याला जिवे मार’ अशी ओरडत हाेती. त्यामुळे नरेशचा राग अनावर हाेत त्याने कैलाशच्या डाेक्यावर फावड्याने वार केला. फावड्याचा दांडा तुटल्यानंतर कैलाशचे शरीर दगडाने ठेचून काढले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाेलिसांना दिली आहे.
मृतक कैलाश हा शेळ्यांना चारा आणण्यासाठी शेताकडे जात हाेता. त्याचवेळी आराेपी नरेश गेडेकर व त्याची आई ललिता गेडेकर हे दाेघेही घराकडे परत येत हाेते. दाेघांचीही गाठभेट झाली. कैलाशच्या पत्नीच्या मुद्द्यावरून नरेश व कैलाश यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यादरम्यान नरेशने कैलाशवर हात उगारला.
दाेघेही एकमेकांना भिडले असताना नरेशची आई ‘याला जिवे ठार मार’ अशी सातत्याने ओरडून नरेशच्या रागाचा पारा चढवित हाेती. त्यामुळे रागाने लाल झालेल्या नरेशने कैलाशच्या डाेक्यावर फावड्याने जाेरदार वार केला. त्यामुळे कैलाश जमिनीवर काेसळला. एवढ्यावरही नरेशचे समाधान झाले नाही. त्यानंतर पुन्हा फावड्यानेच वार करण्यास सुरुवात केली. फावड्याचा दांडा तुटल्यानंतर पुन्हा दगडाने कैलाशला ठेचून काढले. यात कैलाश हा जागीच ठार झाला. आपला राग शमविण्यासाठी ललितानेही कैलाशला झाेडपून काढले.
अनैतिक संबंधामुळे घडले हत्याकांड
आरोपी नरेशचे मृतक कैलाशच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधामुळे कैलास व त्याची पत्नी यांच्यात वाद होऊन दोन वर्षांपूर्वी ती माहेरी निघून गेली होती. याचा राग मृतकाला होता. त्यामुळे मृतक व आरोपी यांच्यात नेहमीच भांडण होत होते, अशी कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या ५ जून रोजी झालेले भांडण कैलाशचा जीव घेऊनच संपले. त्यातील आरोपीला पत्नी व चार वर्षांची मुलगी आहे तर मृतकाला मुले नाहीत.
आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
गडचिराेली पाेलिसांना माहिती हाेताच पाेलिसांनी पुलखल गाठून नरेशला अटक करून ठाण्यात आणले. तपासादरम्यान कैलाशचा खून आपण एकट्यानेच केला, असे सांगून नरेश हा पाेलिसांची दिशाभूल करीत हाेता. गडचिराेली ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी एपीआय पूनम गाेरे यांनी पुलखल गाठून साक्षीदारांचे मत नाेंदविले. त्यात नरेशची आई ललितानेसुद्धा कैलाशवर वार केल्याचे सांगितले. त्यावरून पाेलिसांनी तिच्याविराेधातही कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ८ जूनपर्यंत ते पाेलीस काेठडीत हाेते. ८ जून राेजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दाेघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.