१३ ट्रकवर सिरोंचात कारवाई

By admin | Published: November 10, 2016 02:17 AM2016-11-10T02:17:31+5:302016-11-10T02:17:31+5:30

सिरोंचा पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभाग गडचिरोली यांनी संयुक्त कारवाई करून १३ ट्रक बुधवारी पहाटे १.१० वाजताच्या सुमारास पकडले.

Action on 13 trucks | १३ ट्रकवर सिरोंचात कारवाई

१३ ट्रकवर सिरोंचात कारवाई

Next

रेती वाहतूक : आरटीओ व पोलिसांकडून रात्री १ वाजता नगरम घाटावर धाड
सिरोंचा : सिरोंचा पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभाग गडचिरोली यांनी संयुक्त कारवाई करून १३ ट्रक बुधवारी पहाटे १.१० वाजताच्या सुमारास पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक एन. जी. बन्सोड व सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे व त्यांच्या पथकाने रात्री १.१० वाजता नगरम नदी घाटावर जाऊन संयुक्त कारवाई केली.
यावेळी रेती वाहतूक करणाऱ्या १३ ट्रक सिरोंचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले व ट्रकचालकांवर कारवाई करण्यात आले. यात सहा ट्रक रेती असलेले व सात ट्रक रिकाम्या स्थितीत जमा करण्यात आले. महाराष्ट्र मोटर वाहन कायद्याच्या २० वाय ए कलमाप्रमाणे कारवाई करून १३ ट्रक जप्त करण्यात आले. यात रेती भरलेले ट्रक क्रमांक टीएस ०५ यूबी २९५९, एपी २४ टीए ५१६६, एडी २४ टीए ३९७८, एपी २९ टीबी ४७७७, एएस ०५ यूजी ०२७९, टीएस ०५ यूबी ७२८९ यांचा समावेश आहे. तर एपी २९ डब्ल्यू १८१८, टीएस ०६ पीबी १११५, टीएस ०६ यूएम ४४, एपी २० टीए ३११५, टीएस ०६ यूबी १११३, टीएस ०६ यूए १४५८, टीएस २५ यूबी ५६७९ यांचा समावेश आहे. हे सर्व ट्रक सिरोंचा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सिरोंचातील रेती तस्करीबाबत अनेक तक्रारी अजुनही कायम आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Action on 13 trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.