भामरागडात संचारबंदीचे नियम न पाळणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:02 PM2020-06-06T15:02:50+5:302020-06-06T15:03:10+5:30
लॉकडाऊनमध्ये ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात एका दुकानदारावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: लॉकडाऊनमध्ये ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात एका दुकानदारावर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. कोरोनाविषाणूला रोखण्यासाठी प्रशासनाने सकाळी ८ ते संध्याकाळी ४ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. ज्यात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे व पाचहून अधिक व्यक्ती दुकानात न राहणे असे नियम होते. मात्र ठरविलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवल्याबद्दल भामरागड येथील ८ व्यापाऱ्यांना कोरोना संसर्ग संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड शुक्रवारी ठोठावला.