सहा दारू तस्करांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:54+5:30

अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाकीतून ३० लीटर व सीजी ५२०२ या क्रमांकाच्या वाहनातून ३० लीटर अशी एकूण १८ हजारांची ९० लीटर दारूसह तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. या

Action against six liquor smugglers | सहा दारू तस्करांवर कारवाई

सहा दारू तस्करांवर कारवाई

Next
ठळक मुद्देमोहफूल दारूसाठा पकडला : अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांचा सापळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुक्तिपथ कार्यकर्ते व गडचिरोली पोलिसांनी सोमवारी अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर सापळा रचून सहा तस्करांकडून ९० लीटर हातभट्टी दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज मुरलीधर भोयर, बंडू पांडुरंग म्हशाखेत्री दोघेही रा. अडपल्ली, गजानन पत्रू कोहपरे, विजय पत्रू कोहपरे, उत्तम राजाराम दास, अन्नाजी पत्रू कुळमेथे सर्व रा. दिभना असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
दारूची तस्करी होत असल्याची माहिती मुक्तीपथ अभियानाच्या चमूने गडचिरोली पोलिसांना दिली. त्यानुसार अमिर्झा-धुंडेशिवणी मार्गावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून वाहनांची झडती घेतली. दरम्यान एमएच ३३-४६८४ या क्रमांकाच्या दुचाकीला अडवून तपासणी केली असता ३० लीटर मोहफुलाची दारू आढळून आली. त्यानंतर याच मार्गाने येणाऱ्या एमएच ३३ बी ३०६५ या क्रमांकाच्या दुचाकीतून ३० लीटर व सीजी ५२०२ या क्रमांकाच्या वाहनातून ३० लीटर अशी एकूण १८ हजारांची ९० लीटर दारूसह तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहाही आरोपींविरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, सहायक फौजदार भास्कर ठाकरे, बीट अमलदार प्रमोद वाळके यांनी केली.
कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात दारूबंदी लागू असून सुद्धा झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेकजण छुप्या मार्गाने अवैध दारूचा व्यवसाय करीत आहे.
या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन देखील युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र, काही विक्रेते नवनवीन शकल लढवित जिल्ह्यात दारूचा पुर निर्माण करीत अनेक कुटुंब उध्वस्त करीत आहेत. त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान कार्यरत असून प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातून दारू हद्दपार करण्यासाठी प्रयत्नरत आहे. इतर ठिकाणावरून आणून गावात दारूची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्यास पोलीस प्रशासनाला मुक्तिपथ अभियानाने सहकार्य केले आहे.

घरपोच मिळतो सुगंधित तंबाखूचा खर्रा
कोरोना लॉकडाऊनच्या काळात गडचिरोली शहरातील पानठेले बंद असले तरी अनेकांनी घरीच खर्रा घोटायचा व्यवसाय सुरू केला आहे. शिवाय बरेच जण पायदळ फिरून, काहीजण सायकल व दुचाकीने फिरून छुप्या पद्धतीने खºर्याची विक्री करीत आहेत. इंदिरा गांधी चौकातही हा खर्रा शौकिनांना उपलब्ध होत आहे. एकूणच शहरातील दारू व खर्रा विक्रीवर १०० टक्के निर्बंध आणण्याचे प्रशासन व मुक्तिपथसमोर मोठे आव्हान आहे.

Web Title: Action against six liquor smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.