गडचिरोली तालुक्यातील सहा दारूविक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई

By admin | Published: February 15, 2017 01:37 AM2017-02-15T01:37:02+5:302017-02-15T01:37:02+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शक व शांततामय वातावरणात

Action on crackdown on six liquor vendors in Gadchiroli taluka | गडचिरोली तालुक्यातील सहा दारूविक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई

गडचिरोली तालुक्यातील सहा दारूविक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई

Next

निवडणूक : १६ जणांकडून बंद पत्र लिहून घेतले
गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शक व शांततामय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने गडचिरोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सहा दारूविक्रेत्यांना तडीपार केले आहे. त्याचबरोबर १६ दारूविक्रेत्यांकडून बंदपत्र लिहून घेण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. गडचिरोली तालुक्यातील दारूविक्रेते विमलाबाई दाजीबा उंदीरवाडे, विनोद ऊर्फ डेनी खुशाल खेवले, भय्याजी मनोहर लाडे तिघेही रा. गोगाव, रत्नमाला खुमदेव चरडुके रा. मोहझरी, रजनी राजेंद्र कोतपल्लीवार रा. कनेरी, सोनू व्यंकटेश गड्डमवार रा. मुडझा यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम/१४४ (१) नुसार दिनांक २४ फेब्रुवारीचे रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीत वास्तव्य करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींना मतदार असल्यास त्यांना मतदान करण्याकरिता पोलीस स्टेशनला सुचित करून मतदानाचा हक्क बजावता येईल, असा आदेश १३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. तसेच मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ९३ नुसार चांगली वर्तणूक ठेवण्याबाबत गडचिरोली येथील वनीता काशिनाथ भोयर, तौफीक कैसर सय्यद, अलियर मोहसिम खान, गोगाव येथील हेमराज दाजीबा उंदीरवाडे, मोहझरी येथील नीलेश वामनराव महामंडरे, गडचिरोलीतील विनोद गणपत टेकाम, नामदेव दयाराम भांडेकर, रवींद्र लक्ष्मण बुरले, सुशिल पांडुरंग मेश्राम, एकनाथ श्रावण शेंडे, पोर्ला येथील परशुराम दागो ठाकरे, कनेरी येथील येळंदर मळय्याजी गणबोईनवार, कोटगल येथील मायाबाई देवाजी कोमावार, गोगाव येथील भैय्याजी मनोहर लाडे, गडचिरोली येथील सिद्धार्थ सुभाष सिरसाट, मायाबाई एकनाथ भोयर व गणेश खुमदेव पिपरे यांच्याकडून १ लाख रूपये जमिनानिशी, बंधपत्र लिहून घेण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दारूविक्रेत्यांना हद्दपार केल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान दारूविक्री थांबून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा गडचिरोली तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Action on crackdown on six liquor vendors in Gadchiroli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.