चोरीची वीज घ्याल तर कारवाई अटळ; प्रशासकीय यंत्रणेचा गणेश मंडळांवर 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 12:19 PM2024-09-04T12:19:42+5:302024-09-04T12:20:46+5:30

Gadchiroli : डीजेच्या आवाजाची मर्यादा पाळाच नाहीतर कारवाईला तयार राहा

Action is inevitable if stolen electricity is taken; Administrative system 'watch' on Ganesh Mandals | चोरीची वीज घ्याल तर कारवाई अटळ; प्रशासकीय यंत्रणेचा गणेश मंडळांवर 'वॉच'

Action is inevitable if stolen electricity is taken; Administrative system 'watch' on Ganesh Mandals

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
गणेश उत्सवांसाठी मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत असणे आवश्यक आहे. मात्र, खर्च वाचविण्याच्या नादात काही मंडळांचे पदाधिकारी चोरीची वीज वापरतात. याबाबत महावितरणने यंदा कठोर धोरण अवलंबिले आहे. तसेच डीजेच्या आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या मंडळांवर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाय योजना कराव्यात व वीजपुरवठ्याच्या दराने सार्वजनिक उत्सवांसाठी उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी असे, आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.


महाराष्ट्र वीज नियामक आयोग महावितरणच्या अखत्यारितील सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजपुरवठ्याच्या दराने वीज देणार आहे. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी टाळून सार्वजनिक उत्सवांकरिता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, या उत्सवांकरिताच्या मंडप, रोषणाई, देखावे, महाप्रसाद व इतर कार्यक्रमांसाठी लागणारी वीज व्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक मंडळांनी संपर्क साधावा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे. 


खबरदारी पाळा, वीज अपघात टाळा 
सार्वजनिक गणेश मंडळांनी रोषणाई आणि मिरवणुकीतील देखाव्याच्या परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित झाल्याने अपघात होण्याची शक्यता असते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात. त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना सणांचा आनंद घेता यावा यासाठी खबरदारी बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.


मोठ्या आवाजाने कानाला धोका
तशी तर डीजे वाजवायला परवानगीच नाहीः परंतु काही अटी व शर्तीवर ५० ते ७० डेसिबलपर्यंत डीजे वाजवायला परवानगी आहे. ७० डेसिबलपर्यंतचा आवाज हा कानासाठी सहनशील आहे. मात्र, त्यापेक्षा थोडातरी आवाज वाढला तर कानाला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे डीजेचा वापर टाळावा.

Web Title: Action is inevitable if stolen electricity is taken; Administrative system 'watch' on Ganesh Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.