वन विभागाची मोकाट जनावरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:56 AM2018-09-15T00:56:42+5:302018-09-15T00:57:46+5:30

आलापल्ली व तलवाडा उपक्षेत्रात लावण्यात आलेला साग रोपवनाची नासाडी करणाऱ्या ११० मोकाट जनावरांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना वन विभागाच्या निवासस्थानांमध्ये डांबून ठेवले होते.

 Action on wild animals in forest department | वन विभागाची मोकाट जनावरांवर कारवाई

वन विभागाची मोकाट जनावरांवर कारवाई

Next
ठळक मुद्देरोपवनाचे नुकसान : निवासस्थानाच्या आवारात ठेवले डांबून, दंडात्मक कारवाईनंतर होणार सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली व तलवाडा उपक्षेत्रात लावण्यात आलेला साग रोपवनाची नासाडी करणाऱ्या ११० मोकाट जनावरांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना वन विभागाच्या निवासस्थानांमध्ये डांबून ठेवले होते.
आलापल्ली व तलवाडा तसेच आजुबाजुच्या गावातील मोकाट जनावरे रोपवनाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत होते. वन विभागाने १२ सप्टेंबर रोजी या जनावरांना पकडून त्यांच्यावर जप्तीची केली. मात्र आलापल्ली येथे कोंडवाडा नसल्याने सदर जनावरे ठेवण्यास ग्रामपंचायतीने नकार दिला. परिणामी ही जनावरे उपविभागीय वनाधिकारी यांच्यासाठी असलेल्या निवासस्थानांच्या आवारात ठेवण्यात आली. या प्रकरणात वनगुन्हा नोंदविण्यात आला. आदेशाकरिता उपविभागीय वनाधिकारी यांच्याकडे प्रकरण सादर करण्यात आले होते. ही कारवाई आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, एच. जी. मडावी यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी के. डी. पाटील, आर. बी. मडावी, ए. सी. गुरनुले व इतर कर्मचाºयांनी केली.
जनावरांना कोंडवाड्यात न टाकता उपविभागी वनाधिकारी आलापल्ली यांच्या निवासस्थानाच्या आवारात ठेवण्यात आले आहे. ही बाब जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहित पडली. जनावरांना चारा, पाणी न देता डांबून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी वन विभागाच्या अधिकाºयांसोबत चर्चा करून या जनावरांना सोडून देण्याची सूचना कंकडालवार यांनी केली. मात्र सायंकाळपर्यंत जनावरांना सोडण्यात आले नव्हते.
यावेळी माजी सरपंच दिलीप गंजीवार, जुलेब शेख, ग्राम विकास अधिकारी रमन गंजीवार, प्रशांत गोडसेलवार व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
जनावरांसाठी नर्सरीमधून हिरवा चारा आणण्यात येत होता. जनावरांची काळजी घेतली जात आहे. जनावरांचे मालक सुध्दा जनावरांना चारा आणून टाकू शकतात. वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करून जनावरे सोडले जातील.
- किरण पाटील,
वन परिक्षेत्राधिकारी,
आलापल्ली

Web Title:  Action on wild animals in forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.