आरोग्यासाठी निसर्गाशी नाते जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:55 AM2018-06-03T00:55:27+5:302018-06-03T00:55:36+5:30
दूषित आहार, हवा व पाणी यांच्यामुळे मानवी शरीर कमजोत होत चालले आहे. सुदृढ शरीर व चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढवा, असे प्रतिपादन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : दूषित आहार, हवा व पाणी यांच्यामुळे मानवी शरीर कमजोत होत चालले आहे. सुदृढ शरीर व चांगल्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढवा, असे प्रतिपादन डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांनी केले.
डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये आरोग्य संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी स्टुडन्ट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सुनिता पुसावी, सचिव सुष्मिता रॉय, निता बावणे, रोशन करंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. प्रमोद साळवे यांनी रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने निपाह सारख्या नवीन व्याधी निर्माण होत आहेत. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी वनौषधीचा वापर करावा, वनसंवर्धन केल्यास विपुल प्रमाणात वनौषधी उपलब्ध होईल, असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रगती साळवे, मानसी साळवे, स्नेहा गेडाम, रेश्मा चितेली, प्राची नारनवरे यांनी विचार व्यक्त केले. उपस्थितांचे आभार स्नेहा गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रफुल्ल कोसरे, ओजस्विनी नरताम, काजल उडाण, मोनाली गडपाडे, शिल्पा तलांडे, विनोदा दुर्गे, तेजस्विनी लाकडे, हिना शेंडे, कलावती येनका, मनिषा पिरला, सोनाली कुमरे, तब्बू गेडाम, मोनिका तुलावी, प्रिया आत्राम, विजया कठाणे, अश्विनी पदा, राखी इजतदार, शिवानी येम्पलवार, सोनिया काटकुरवार, वंदना मंडल, अपर्णा मंडल, पूजा वाकुडकर, मयुरी कुत्तरमारे, प्रियंका सोयाम, माधुरी मारगाये, पुनम चरडुके, मानसी चुनारकर, मृणालिनी तोराम, दीक्षा झाडे यांनी सहकार्य केले.