व्यसन हा व्यक्तीश: मानसिक रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:22 PM2017-12-04T23:22:43+5:302017-12-04T23:22:59+5:30
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कोणताच व्यक्ती दुसऱ्याला व्यसन लावत नाही. व सोडवतही नाही. नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची वृत्ती वाढली आहे. तेव्हा आपली संस्कृती कुठे जाते, आपले प्रत्येक व्यसन प्रत्येक वेळी चॅलेंज करीत असतो की, तुम्ही या व्यवसनावर विजय मिळवू शकता का? कौंटुंबिक वादामुळे मुले व्यसनाकडे वळतात. आपण आपले विचार व्यक्त न करता व्यसनांच्या आहारी जातो. व्यसन दुसºयामुळे लागत नसून व्यसन हा एक मानसिक रोग आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते होते. प्रमुख अतिथी म्हणून न्या. पी. बी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. कुंभारे, डॉ. शेंदरे, किशोर वैैद्य, डॉ. रंजन यादव, डॉ. अनुप महेशगौरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते म्हणाले, मौखिक आरोग्य महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती व्यसन करीत नाही त्यांनाही कर्करोग होतो, त्यामुळे मौखिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती टिकविणे गरजेचे आहे.
याप्रसंगी न्या. पाटील यांनी समाजात दुधाच्या दुकानापेक्षा पानटपºयांचे प्रमाण अधिक आहे. एकूण ९० केसेसमध्ये पानठेल्यावरील वाद अधिक वाद समोर येतात. सदर घटना पानठेल्यावर घडलेली असते. प्राणी व्यसन करीत नाही. परंतु माणसाला बुद्धी असूनही तो व्यसन करतो, असे प्रतिपादन केले. डॉ. अनिल रूडे, डॉ. शशिकांत शंभरकर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन राहूल कंकनालवार, प्रास्ताविक डॉ. नंदू मेश्राम तर आभार दिनेश खोरगडे यांनी मानले.