मार्कंडादेव यात्रेत व्यसनमुक्तीचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:48 AM2018-02-22T00:48:48+5:302018-02-22T00:49:15+5:30

महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डा येथे झालेली यात्रा यंदाही दारू व तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न मुक्तीपथच्या वतीने करण्यात आला.

Addictive alarm at Markandev Yatra | मार्कंडादेव यात्रेत व्यसनमुक्तीचा गजर

मार्कंडादेव यात्रेत व्यसनमुक्तीचा गजर

Next
ठळक मुद्देचोरट्या मार्गाने भागविली तलफ : तंबाखूजन्य पदार्थ, दारूच्या बाटल्यांची काढली अंत्ययात्रा

ऑनलाईन लोकमत
मार्कंडा : महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कं डा येथे झालेली यात्रा यंदाही दारू व तंबाखुमुक्त करण्याचा प्रयत्न मुक्तीपथच्या वतीने करण्यात आला. त्यासाठी प्रशासनानेही बºयापैकी सहकार्य केले. मात्र खर्रा व तंबाखूप्रेमी यात्रेतच चोरट्या मार्गाने तर मद्यप्रेमी लोक नदीतिरापलिकडील साखरी घाटावर (जिल्हा चंद्रपूर) जाऊन नशापूर्ती करून येत असल्याचे दिसून आले.
ज्येष्ठ सामाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखुमुक्त करण्यासाठी २०१६ पासून मुक्तिपथ अभियान सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सार्वजनिक उत्सव, ठिकाणे दारू व तंबाखुमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत मार्कंडाची यात्रा गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नशामुक्त करण्याचा प्रयत्न झाला. पण यात्रेत सापडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या, खºर्याच्या रिकाम्या पन्न्या, तंबाखूची रिकामी पाकिटे पाहिल्यानंतर नागरिकांवर नशामुक्तीचा प्रभाव झालाच नसल्याचे दिसून येत होते. मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी पथनाट्यातून व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले. याशिवाय यात्रेत जमा झालेले तंबाखुजन्य पदार्थ, दारूच्या बाटल्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली व शेवटी त्याची होळी करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वर रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक कांबळे, मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बाहेरगावाहून आलेले काही विद्यार्थीही यात सहभागी झाले होते. दक्षिणेची काशी समजल्या जाणाºया मार्कंडादेव यात्रेमध्ये नशामुक्तीबद्दल जनजागृती केल्याने लोकांच्या समजुतीमध्ये व व्यवहारामध्ये बदल घडेल, असा विश्वास या अभियानाबद्दल डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केला.
यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्याची कल्पना गेल्यावर्षी मुक्तिपथतर्फेमांडण्यात आली होती. याला मार्कंडा मंदिर समिती व स्थानिक प्रशासनाने सहकार्य केले. यात्रेदरम्यान कोणालाही खर्रा व तंबाखूची विक्र ी न करण्याच्या अटीवर दुकानांसाठी जागा देण्यात आली. स्थानिक पानठेलेधारकांनीही या काळात आपली दुकाने बंद ठेवली असली तरी चोरट्या मार्गाने काही लोकांकडून विक्री सुरूच होती. मंदिर परिसरात कोणीही खर्रा तंबाखूचे सेवन करू नये यासाठी प्रवेशद्वारावर भाविकांना त्यांच्याजवळील खर्रा, तंबाखू, बिडी, सिगरेटची पाकिटे एका पेटीत टाकण्याचे आवाहन मुक्तिपथच्या स्वयंसेवकांनी केले. सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनीही या उपक्रमाला काही प्रमाणात का होईना, सहकार्य केले.

Web Title: Addictive alarm at Markandev Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.