पौष्टिक रानभाज्या घालताहेत भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:04+5:302021-06-27T04:24:04+5:30

भामरागड (गडचिरोली) : जंगलालगत राहणारा आदिवासी समाज आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. त्याच वनस्पतींमधील ऋतुमानानुसार ...

Adding nutritious legumes | पौष्टिक रानभाज्या घालताहेत भुरळ

पौष्टिक रानभाज्या घालताहेत भुरळ

Next

भामरागड (गडचिरोली) : जंगलालगत राहणारा आदिवासी समाज आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. त्याच वनस्पतींमधील ऋतुमानानुसार वेगवेगळ्या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या काही रानभाज्या अलीकडे शहरी भागातही विकायला आणल्या जात आहेत. विशेष म्हणजे विविध प्रकारचे पौष्टिक घटक आणि औषधीयुक्त गुणधर्म असलेल्या या भाज्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शहरी नागरिकांना या रानभाज्या भुरळ घालत आहेत.

रानभाज्या जंगलात सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची आदिवासी समाजाला पारंपरिकरीत्या माहिती असते. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात रानभाज्या दिसून येतात. कुड्याची भाजी, तोरुटा भाजी या वनस्पतींपैकी काहींचा वापर आदिवासी समाजात विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते.

या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून विविध पदार्थ बनविले जातात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न तयार होतात. काही भाज्या थंड, तर काही उष्णधर्मीय आहेत. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.

(बॉक्स)

काही भाज्या आणि त्यांचे गुणधर्म

कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी, मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. हा फरक सरावाने ओळखता येतो, अशी माहिती रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करणारे यशोधन देशमुख देतात. या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत शाकाहारी किंवा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घेता येतो.

(कोट)

जंगलात मिळणाऱ्या रानभाज्यांचे सेवन आदिवासी समाज नेहमीच करत असल्याने त्यांच्यासाठी ते शक्तिवर्धक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे ठरत आहे. यामध्ये चावावेल, कार्टुल, शेऊळ, शेवाळे, कुड्याचे फूल, चारा, घोळ, रताळ्याचे कोंब, भोपा, चायवळ, मशरूम, काटवल आणि पावसाळ्याच्या दिवसात जंगलात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचा उल्लेख करता येईल. निसर्गाच्या सानिध्यात या रानभाज्या वाढत असल्याने त्या रसायनविरहित असतात. नागरिकांनी या रानभाज्यांचा भरपूर प्रमाणात आस्वाद घ्यावा.

- प्रा. डॉ. कैलास निखाडे,

निसर्ग अभ्यासक, भामरागड

===Photopath===

260621\26gad_1_26062021_30.jpg

===Caption===

26gdph28.jpg

Web Title: Adding nutritious legumes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.