नवीन ७३ कोरोनाबाधितांची भर तर २२ जण काेरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:20+5:302021-04-01T04:37:20+5:30
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित १०६२८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १००५५ वर पोहोचली. तसेच सध्या ४६२ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ...
जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित १०६२८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १००५५ वर पोहोचली. तसेच सध्या ४६२ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १११ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६१ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ४.३५ टक्के, तर मृत्युदर १.४ टक्के झाला.
नवीन ७३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील १९, अहेरी १३, आरमोरी ७, भामरागड तालुक्यातील ११, चामोर्शी ३, धानोरा तालुक्यातील २, एटापल्ली १, कोरची १, कुरखेडा १, तर वडसा तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २२ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १८, भामरागड १, चामोर्शी २, धानोरा १ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये पोस्ट ऑफिसजवळ १, कोटगल १, स्थानिक ५, मेडिकल कॉलनी ३, पीडब्लूडी कॉलनी १, पारडी १, साईनगर १, लक्ष्मीनगर १, एसीबी ऑफिस १, पोलीस कॉलनी १, गोकुलनगर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली ७, स्थानिक ३, नागेपल्ली ३, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये अरसोडा १, इंदिरानगर बर्डी १, स्थानिक ४, कृषी उत्पन्न बाजार समिती १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये देऊळगाव १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये आलेवाडा १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, जोगना १, विकासपल्ली १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प २, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १०, येरवाडा १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारडाकुही १, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये विसोरा १, वीरसी २, सीआरपीएफ कॅम्प ४, भगतसिंग वॉर्ड १, कोकडी १, गांधी वॉर्ड २, एमजी विद्यालय ३, आंबेडकर वार्ड १, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये १ जणाचा समावेश आहे.