पुरेसे ऑक्सिजन बेड्स आणि औषधी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:37 AM2021-04-24T04:37:31+5:302021-04-24T04:37:31+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, ...

Adequate oxygen beds and medicine will be available | पुरेसे ऑक्सिजन बेड्स आणि औषधी उपलब्ध होणार

पुरेसे ऑक्सिजन बेड्स आणि औषधी उपलब्ध होणार

googlenewsNext

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यासाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतर औषधांच्या पुरवठ्यास मंजुरी आणि अतिरिक्त कोट्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित सचिवांकडे दूरध्वनीद्वारे मागणी केली. ही मागणी तातडीने पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिरोंचा, देसाईगंज अशा ठिकाणी तातडीने ऑक्सिजन बेड्स वाढवाविीत असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

(बॉक्स)

तालुका मुख्यालयी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प

येत्या आठवड्यात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील २६५ सिलिंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू होत असून दुसरा ऑक्सिजन प्रकल्प १३५ सिलिंडरचा राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी सिंगला यांनी दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सिरोंचा, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, कोरची व एटापल्ली या ठिकाणीसुद्धा कमी क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करण्याबाबत निर्देश दिले.

ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना केल्या. या ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटरचे वाटप तालुकास्तरावरील कोरोना रुग्णालयात तातडीने केले जाणार आहे.

(बॉक्स)

२०० रेमडेसिविर आरोग्य विभागाकडे सुपूर्द

पालकमंत्र्यांनी यावेळी २०० रेमडेसिविर इंजेक्शन्स आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली. कोरोना रुग्णांची जास्त औषधे घेण्याची इच्छा असते. मात्र, डॉक्टरांनी आवश्यक असलेल्यांनाच रेमडेसिविर किंवा कोणतेही इतर उपचार द्यावेत. संपूर्ण देशासह राज्यात ऑक्सिजन किंवा रेमडेसिविरसारख्या औषधांचा तुटवडा आहे. उपलब्ध साठा गरजूंना मिळेल यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली.

(बॉक्स)

ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिकेसाठी आमदारही देणार निधी

जिल्ह्यातील आमदारांनी प्रत्येकी एक-एक कोटी रुपये आमदार निधी ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यातून तालुकास्तरावरही ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका महत्त्वाचे योगदान देतील, असे पालकमंत्री म्हणाले.

प्रत्येक नगरपालिकेला ५ कोटी कोरोना निधी

नगरपालिकांच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कामे होत असतात. शहरात कोविड रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असते. यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री शिंदे यांनी प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये आकस्मिक निधी देण्याचे जाहीर केले. तसेच गडचिरोली शहरातील सेवाभावी डॉक्टरांनी प्रशासनाकडे १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आवश्यक निधी नगरपालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

Web Title: Adequate oxygen beds and medicine will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.