विकासासाठी प्रशासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:21 PM2018-07-29T22:21:35+5:302018-07-29T22:22:52+5:30

सामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांनी केले.

Administration committed for development | विकासासाठी प्रशासन कटिबद्ध

विकासासाठी प्रशासन कटिबद्ध

Next
ठळक मुद्देचामोर्शी तहसीलदारांचे प्रतिपादन : मार्कंडादेव येथे पोलिसांतर्फे जनमैत्री मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : सामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांनी केले.
एसडीपीओ कार्यालय गडचिरोली व पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वतीने मार्र्कंडादेव येथे जनमैत्री मेळावा तथा निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २९ ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार येरचे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला एसडीपीओ डॉ. सागर कवडे, ठाणेदार गोरख गायकवाड, पीएसआय मल्हार थोरात, सुरेश घोडाम, सरपंच उज्ज्वला गायकवाड, पोलीस पाटील आरती आभारे, मुख्याध्यापक दिलीप शेंडे, गंगाधर कोंडुकवार, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्यूंजय गायकवाड, डॉ. शेषराव भैसारे, कुशल कवठेकर, राजेंद्र अल्लीवार, उद्धव डांगे, विलास निंबोरकर, विठ्ठल कोठारे, शिवराज मोंगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना एसडीपीओ डॉ. कवडे यांनी नक्षल चळवळ मोडीत काढण्यासाठी नक्षल गावबंदी राबविण्याची आवश्यकता आहे. आधुनिक पध्दतीने शेती करून विकास करावा. गडचिरोली जिल्ह्यात गौण वनोपजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. सदर गौणवनोपज गोळा करून त्याची मार्केट तयार करावी, असे आवाहन केले.
या मेळाव्यात ७४ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. त्यांची आरोग्य तपासणी करून औषधांचे वितरण करण्यात आले. संचालन पीएसआय मल्हार थोरात तर आभार पीएसआय सुरेश घोडाम यांनी मानले. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले.

Web Title: Administration committed for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.