काेराेनाला राेखण्यासाठी प्रशासन पाेहाेचले नागरिकांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 05:00 AM2021-04-03T05:00:00+5:302021-04-03T05:00:23+5:30
ज्या परिसरात काेराेनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच भविष्यात काेराेना आढळून येतील, त्या परिसराला साॅफ्ट कंटेनमेंट झाेन घाेषित केले जाईल. साॅफ्ट कंटेनमेंट असलेल्या भागात व्यवहारांवर काेणतेही प्रतिबंध राहणार नाही. मात्र त्या भागातील ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांनी काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक राहणार आहे. यासाठी प्रशासनामार्फत संबंधित नागरिकांना टाेकण दिले जाईल.
लाेकमत न्यूूज नेटवर्क
गडचिराेली : वाढत्या काेराेनाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी थेट नागरिकांच्या दारापर्यंत पाेहाेचून काेराेनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययाेजनांची माहिती देत असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.
जिल्ह्यात काेराेना रूग्णांची संख्या दर दिवशी वाढत चालली आहे. सर्वाधिक रूग्ण गडचिराेली शहरातच आहेत. त्यामुळे प्रशासनाने गडचिराेली शहरात उपाययाेजना करण्यावर विशेष भर दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, गडचिराेलीचे उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेळ, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सुनील मडावी यांच्यासह आराेग्य व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी गडचिराेली शहरातील आशिर्वाद नगरातील ज्या भागात काेराेनाचे रूग्ण आढळले त्या भागाला भेट दिली. नागरिकांसाेबत चर्चा करून प्रशासन राबवित असलेल्या उपाययाेजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील वाढत्या काेराेना रूग्णांची संख्या लक्षात घेऊन काेविड केअर सेंटरची संख्या वाढविली जाईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्ह्यात वाढत असलेल्या काेराेना रूग्णांमध्ये गडचिराेली शहरातीलच रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गडचिराेली शहरातील काेराेना रूग्णांची संख्या नियंत्रित झाल्यास जिल्ह्यातील काेराेनावर नियंत्रण ठेवणे शक्य हाेणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या मार्गदर्शनात माेहिम सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकारी याबाबीकडे लक्ष देऊन असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागून सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक
नगरसेवकाला संबंधित वाॅर्डाच्या स्थितीची बरीच माहिती राहते. त्यामुळे लसीकरणासाठी नगरसेवकांचे सहकार्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत प्रशासनामार्फत राबवित असलेल्या उपाययाेजनांची माहिती नगरसेवकांना दिली जाईल. तसेच यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही केले जाणार आहे. प्रशासनामार्फत राबवित असलेल्या माेहिमेला स्थानिक नगरसेवकांचेही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
काेराेनाचे रूग्ण आढळलेल्या परिसरात साॅफ्ट कंटेनमेंट झाेन
ज्या परिसरात काेराेनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच भविष्यात काेराेना आढळून येतील, त्या परिसराला साॅफ्ट कंटेनमेंट झाेन घाेषित केले जाईल. साॅफ्ट कंटेनमेंट असलेल्या भागात व्यवहारांवर काेणतेही प्रतिबंध राहणार नाही. मात्र त्या भागातील ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांनी काेराेना प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक राहणार आहे. यासाठी प्रशासनामार्फत संबंधित नागरिकांना टाेकण दिले जाईल. या टाेकणवर काेणत्या दिवशी व काेणत्या केंद्रावर काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे, याची माहिती दिली जाईल. २ ते ३ दिवसांत संपूर्ण नागरिकांचे लसीकरण पूर्ण हाेईल, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे. मात्र नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद न दिल्यास त्या परिसराला हाॅर्ड कंटेनमेंट म्हणून घाेषित करून व्यवहारावर प्रतिबंध लादले जातील.
वाढत्या काेराेना रूग्णांची संख्या लक्षात घेता नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे. गडचिराेली शहरात सर्वाधिक रूग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर विशेष भर प्रशासनाने दिले आहे. याला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. ज्या भागात काेराेना रूग्ण आढळून येतील त्या भागाला साॅफ्ट कंटेनमेंट घाेषित केले जाणार आहे. या भागातील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेईल. तरीही नागरिकांनी लसीकरण केले नाही तर हाॅर्ड कंटेनमेंट घाेषित करून व्यवहारांवर प्रतिबंध घातले जाईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिराेली.