अतिदुर्गम नारगुंडा गावात पोहचले प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:39 AM2019-09-02T00:39:17+5:302019-09-02T00:39:54+5:30

तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमकुही, पिडमिली व कोठी येथील ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेण्यात आली.

Administration reached the remote Nargunda village | अतिदुर्गम नारगुंडा गावात पोहचले प्रशासन

अतिदुर्गम नारगुंडा गावात पोहचले प्रशासन

Next
ठळक मुद्देनागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप : तहसीलदारांच्या पुढाकाराने ग्रामस्थांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील व नायब तहसीलदार सोनवाने यांनी अतिदुर्गम नक्षलग्रस्त संवेदनशील असलेल्या तालुक्यातील नारगुंडा गावाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. दरम्यान ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेऊन नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तहसीलदार कैलास अंडील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी किरण वाघ यांच्यासोबत स्वत: पायदळ चालत नारगुंडा गावाची पाहणी केली. त्यानंतर नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दितील कुचेर, खडी, नैनवाडी, मुत्तेमकुही, पिडमिली व कोठी येथील ग्रामस्थांची जनसंपर्क बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान तहसीलदार अंडील यांनी सर्व ग्रामस्थांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र तहसील कार्यालयातून त्वरीत पुरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नारगुंडा परिसरातील सर्व गावातील लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी प्रतिसाद फाऊंडेशन यवतमाळचे अध्यक्ष मनोज गुलाने व त्यांची चमू उपस्थित होती. याप्रसंगी सर्व ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे कोतवाल मनोहर पुंगाटी यांनी केले तर आभार पोलीस उपनिरिक्षक तुकाराम खडके यांनी मानले. कार्यक्रमाला महसूल विभागाचे कर्मचारी दिनकर परसा, रामजी वड्डे, गाव पाटील बिरजू पुंगाटी, सतू हेडो, कातीय कुड्यामी, बाजीराव मडावी आदी उपस्थित होते. तहसीलदारांच्या भेटीमुळे व त्यांनी केलेल्या मदतीमुळे सर्व ग्रामस्थांच्या चेहºयावरील आनंद पाहण्यासारखा होता.

Web Title: Administration reached the remote Nargunda village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.