काेराेना जनजागृतीसाठी प्रशासनाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:38 AM2021-04-09T04:38:58+5:302021-04-09T04:38:58+5:30
जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल राेजी काेराेना नियंणासंदर्भात काही कडक निर्बंध व टाळेबंदी जाहीर केली आहे. सर्व जनतेने या ...
जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल राेजी काेराेना नियंणासंदर्भात काही कडक निर्बंध व टाळेबंदी जाहीर केली आहे. सर्व जनतेने या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नियमांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी गडचिराेली शहरातून ८ एप्रिल राेजी तहसील कार्यालय ते इंदिरा गांधी चाैकातील मुख्य मार्केटपर्यंत जनजागृती करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत साेमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद राहतील. तसेच शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊन असेल. नागरिकांनी बाहेर पडताना सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे सूचना देण्यात आल्या. रॅलीत नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, डी.एन.गुटे, पाेलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ.सुनील मडावी, वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनाेद बेटपल्लीवार, उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, महिला व बाल विकास अधिकारी एन.आर.परांडे, गटविकास अधिकारी पदा, गणेश ठाकरे, गणेश नाईक आदी कर्मचारी सहभागी झाले हाेते.
बाॅक्स....
तीन दुकानांवर ठाेठावला दंड
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवायची आहेत. तरीही काही दुकाने सुरू करण्यात आली हाेती. तसेच अत्यावश्यक सेवेमधील काही दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविलेल्या नियमांचे पालन केले नव्हते, अशा तीन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्यास फाैजदारी कारवाई करण्याचा इशारा संबंधित दुकानदारांना देण्यात आला.