१०० खाटांच्या रुग्णालयात २५० रुग्ण भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:57+5:302021-09-06T04:40:57+5:30
बाॅक्स ..... दरराेज ३० महिलांची प्रसूती ग्रामीण भागातून अनेक गराेदर महिलांना थेट महिला व बाल रुग्णालयात पाठविले जाते. दर ...
बाॅक्स .....
दरराेज ३० महिलांची प्रसूती
ग्रामीण भागातून अनेक गराेदर महिलांना थेट महिला व बाल रुग्णालयात पाठविले जाते. दर दिवशी या ठिकाणी ३० महिलांची प्रसूती केली जाते. प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात हे दाेन्ही वाॅर्ड फुल भरून आहेत. अनेकांना जागा नसल्याने जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत.
बाॅक्स ......
५० नवजात शिशू भरती
कमी दिवसांत जन्माला आलेले, वजन कमी असलेले, जन्मजात व्यंग असलेल्या बालकांना भरती करण्यासाठी या रुग्णालयात २४ रुग्णांची क्षमता आहे. मात्र, सद्य:स्थितीत या ठिकाणी सुमारे ५० बालके उपचार घेत आहेत. २९ दिवसांच्या पुढचे जवळपास ४५ बालके उपचार घेत आहेत. ३३ कुपाेषित बालकांवरही उपचार सुरू आहेत.
बाॅक्स .....
रेफर टू गडचिराेलीमुळे समस्या वाढली
गावपातळीवरील उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची सुविधा उपलब्ध आहे. अतिशय गुंतागुतीची प्रसूती असेल तरच त्या महिलेला जिल्हास्तरावर पाठविणे अपेक्षित आहे. मात्र, उपकेंद्र, प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये येथील डाॅक्टर थेट महिला व बाल रुग्णालयात गराेदर महिलेला रेफर करतात. रेफर करण्याच्या प्रकारामुळे येथे गर्दी वाढत चालली.