समुपदेशन फेरीद्वारे ७ पर्यंत आयटीआयमध्ये मिळणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:31+5:302021-02-06T05:08:31+5:30
समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून उमेदवारांनी प्रवेशासाठी आपल्या लाॅगइनवरून समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करावी. ...
समुपदेशन फेरीसाठी संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून उमेदवारांनी प्रवेशासाठी आपल्या लाॅगइनवरून समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करावी. ८ फेब्रुवारीला या फेरीसाठी गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रकाशित होईल. ९ ते १५ फेब्रुवारीदरम्यान उमेदवारांना दिलेल्या संदेशात नमूद संस्थेत दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत स्वत: हजेरी लावावी. त्याचदिवशी समुपदेशन फेरीसाठी दुपारी १ वाजता गुणवत्ता यादी प्रकाशित होईल आणि उपलब्ध जागेनुसार जागेचे वाटप होईल. याकरिता उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे, असे प्राचार्य संतोष साळुंके यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश प्रमुख मधुपवार किंवा नितीन श्रीगिरीवार यांच्याशी संपर्क साधावा.