नामांकित निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:38 AM2021-02-24T04:38:14+5:302021-02-24T04:38:14+5:30
निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया ...
निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रवेश देण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा व दिनांक १ जून २०१४ ते १ जून २०१५ या कालावधीत जन्मलेला असावा. विद्यार्थ्याचा पालक शासकीय/निमशासकीय नोकर नसावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लक्ष पेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत विधवा/घटस्फोटीत /निराधार व बी.पी.एल यादीतील पाल्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किंवा जवळच्या शासकीय/अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक यांचे कडे दिनांक ३० एप्रिलपर्यंत सादर करावे. असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी केले आहे.