उन्नतीचे दालन

By admin | Published: June 15, 2014 11:31 PM2014-06-15T23:31:38+5:302014-06-15T23:31:38+5:30

मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात

Advance hall | उन्नतीचे दालन

उन्नतीचे दालन

Next

कृषी यंत्र बँक : ३७ शेतकरी गटांनी धरली यांत्रिकीकरणाची कास
गडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण वाढविण्यासाठी ११ जिल्ह्यातील ३७ शेतकरी गटांना पॉवर टिलर, भात रोवणी, कोनोविडर, युरीया ब्रिकेट अप्लीकेटर व भात कापणी आदी पाच यंत्रे ९० टक्के सवलतीवर पुरविण्यात आली आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने या शेतकरी गटांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. हे ३७ शेतकरी गट कृषी यंत्र बँक सेवा सुरू करणार असल्याने कृषी यंत्र बँक उन्नतीचे दालन ठरणार आहे.
कोरची, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यात प्रत्येकी ५ शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे.तर धानोरा तालुक्यात १, एटापल्ली २, भामरागड १, अहेरी २, सिरोंचा तालुक्यात एका शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे. या ३७ शेतकरी गटांना मानव विकास मिशन अंतर्गत कृषी विभागामार्फत शेती लागवडीची पाच यंत्रे ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात आली आहे.
सदर यंत्रााचा वापर शेती कामात कसा करायचा, याबाबतचे प्रशिक्षण कृषी विभागाने या गटातील शेतकऱ्यांना दिले आहे. हे शेतकरी गट यंदाच्या खरीप हंगामापासून सामुहिकरित्या यांत्रिकीकरणाद्वारे आधुनिक शेती करणार आहेत. या पलिकडेही रोवणी, कापणी, मळणी या कामासाठी त्यांच्याकडे असलेल्या कृषी यंत्र बँकेतून यंत्राचा पुरवठा भाडे तत्वावर करणार आहेत. जिल्ह्यात शेती लागवडीच्या कामासाठी दरवर्षी मजुराची टंचाई भासते. गडचिरोली शहरातून परिसरातील खेडेगावात दरवर्षी ट्रॅक्टर, आॅटो व इतर वाहनामध्ये बसवून रोवणी करण्यासाठी महिला मजुरांना नेले जाते. यात शेतकऱ्यांना वाहनाचे भाडे व वाढलेली मजुरी द्यावी लागते. परिणामी शेती लागवडीचा खर्च वाढतो. मजुराच्या टंचाईवर मात करून कमी खर्चात फायद्याची शेती व्हावी यासाठी यावर्षीपासून कृषी विभागाने यांत्रिकीकरणाचे पर्व जिल्ह्यात सुरू केले आहे. यंदा पहिल्या वर्षी ३७ शेतकरी गटांचे कृषी यंत्र बँकेतून आर्थिक स्वावलंबन व सक्षमीकरण करण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.
पुरूष शेतकरी गटांसोबतच महिला शेतकरी गटांनाही पुढील वर्षापासून मानव विकास मिशन अंतर्गत कृषी यंत्र ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार असून त्यांचेही सक्षमीकरण करण्याचा मानस कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यंत्राद्वारे शेतीची पूर्व मशागत, चिखलणी, रोवणी, निंदणी व कापणी आदी सर्व कामे करण्यात येणार आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ५०० हेक्टर क्षेत्रात यंत्राद्वारे भात पिकाची लागवड करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Advance hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.