इंटरनेटच्या खाेळंब्याने कामे खाेळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:48+5:302020-12-30T04:45:48+5:30

गडचिरोली : धानोरा मार्गावर असलेल्या चातगाव येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे ...

With the advent of the Internet, things got trickier | इंटरनेटच्या खाेळंब्याने कामे खाेळंबली

इंटरनेटच्या खाेळंब्याने कामे खाेळंबली

Next

गडचिरोली : धानोरा मार्गावर असलेल्या चातगाव येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन कामे खोळंबली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

चातगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी अनेक विभागाचे शासकीय कार्यालये आहेत. स्टेट बँक, वनविभाग, तलाठी, शाळा, महाविद्यालय आदी कार्यालये आहेत. सध्या सर्व कामे ऑनलाईन केली जात आहेत. याशिवाय या ठिकाणी व्यापारी प्रतिष्ठाने व नेट कॅफे आहे. परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी ऑनलाईन कामे करण्यासाठी येतात. आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील स्टेट बँक शाखेत येतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे शासकीय कार्यालय व बँकेत आलेल्या नागरिकांना सायंकाळपर्यंत ताटकळत बसावे लागत आहे. परिणामी नागरिकांचा वेळ व पैसा विनाकारण वाया जात आहे.

चातगाव येथे बीएसएनएलचे टॉवर आहे, मात्र नियमित ऑपरेटर नाही. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बºयाचदा भ्रमणध्वनीचे रेंजही राहत नाही.

Web Title: With the advent of the Internet, things got trickier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.