नळ पाईपलाईन व टाकीची कामे प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:00 AM2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:02+5:30
कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक बाब म्हणून पाणीपुरवठा, नळ पाईपलाईन व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामांना परवानगी दिली आहे. पाणी ही माणसाची अत्यावशक गरज असल्याने ही कामे सुरू ठेवावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. गडचिरोली पालिकेअंतर्गत लाखो रुपयातून विसापूर व हनुमान वॉर्डात स्वतंत्र टाकीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही पाणीटाकी व नळपाईपलाईनची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पार पाडून वर्कआदेश देण्यात आले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले. मात्र कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने दोन्ही ठिकाणच्या पाणीटाकीचे काम रखडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीमुळे परराज्यातील कुशल मजूर स्वत:च्या गावात अडकून पडल्याने तसेच मोठ्या शहरातील कंत्राटदार अडकून पडले आहेत. परिणामी स्थानिकस्तरावर अनुभवी व कुशल मजूर मिळत नसल्याने गडचिरोली पालिकेअंतर्गत शहरात दोन पाणीटाकीचे तसेच वाढीव नळ पाईपलाईनची कामे प्रभावित झाले आहेत.
कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक बाब म्हणून पाणीपुरवठा, नळ पाईपलाईन व पाईपलाईन लिकेज दुरूस्तीच्या कामांना परवानगी दिली आहे. पाणी ही माणसाची अत्यावशक गरज असल्याने ही कामे सुरू ठेवावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. गडचिरोली पालिकेअंतर्गत लाखो रुपयातून विसापूर व हनुमान वॉर्डात स्वतंत्र टाकीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दोन्ही पाणीटाकी व नळपाईपलाईनची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पार पाडून वर्कआदेश देण्यात आले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी हे काम सुरू करण्यात आले. मात्र कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने दोन्ही ठिकाणच्या पाणीटाकीचे काम रखडले आहे.
गडचिरोली पालिका प्रशासनाच्या वतीने इंदिरानगर व गोकुलनगर, विसापूरसह वाढीव नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या संचारबंदीत कुशल मजूर मिळत नसल्याने हे काम रखडून पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
मार्गाच्या खोदकामाने नळाचे पाणी मिळेना
गडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून मोठ्या यंत्राच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. चामोर्शी मार्गावर शासकीय विज्ञान महाविद्यालय ते डाक विभागाच्या कार्यालयापर्यंत हे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान खोदकामामुळे चार ते पाच ठिकाणची नळपाईपलाईन फुटली आहे. परिणामी १० ते १२ कुटुंबांना नळाचे पाणी मिळत नसल्याची माहिती आहे. फुटलेली नळ पाईपलाईन दुरूस्तीसाठी मजूर उपलब्ध नसल्याने हे काम थांबले आहे.
नवीन हातपंपाच्या खोदकामालाही लागला ब्रेक
कोरोनाच्या संचारबंदीत पाणीपुरवठ्याची कामे करण्यास परवानगी असली तरी वाहतुकीस परवानगी नाही. परिणामी मजुरांना नेता येत नसल्याने हातपंप खोदण्याचे काम थांबले आहे. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अनेकजण नवीन हातपंप खोदण्याचा व्यवसाय करतात. मात्र कोरोनाच्या संचारबंदीत हातपंप खोदण्याच्या या सर्व मशीन व वाहने जागच्या जागी थांबल्या असून नवीन हातपंप खोदण्याच्या कामाला ब्रेक लागला आहे. शहरी भागात नळाचे पाणी मिळत नसल्याने अनेकांनी स्वत:च्या घरी हातपंप खोदण्याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे काम सुद्धा थांबले आहे.