आश्वासनानंतर नगरसेवकाने उपाेषण घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:27+5:302021-08-15T04:37:27+5:30

न.प. सभापती खरकाटे यांनी उपाेषण सुरू केल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि आ. कृष्णा गजबे यांनी समन्वयातून म्हाडाच्या राज्य सचिव ...

After the assurance, the corporator withdrew | आश्वासनानंतर नगरसेवकाने उपाेषण घेतले मागे

आश्वासनानंतर नगरसेवकाने उपाेषण घेतले मागे

Next

न.प. सभापती खरकाटे यांनी उपाेषण सुरू केल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि आ. कृष्णा गजबे यांनी समन्वयातून म्हाडाच्या राज्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून दोन महिन्यात नगर परिषदेतील पंतप्रधान आवास योजनेचा प्रलंबित निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सभापती सचिन खरकाटे यांनी बेमुदत उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी आ. कृष्णा गजबे, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार महाले, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, बबलू हुसैनी, चैतन्यदास विधाते, ज्योतूभाऊ तेलतुंबडे, लालाजी रामटेके, इरफान पठाण, सागर बनपूरकर, अमित फटिंग, अशोका कांबळी, अण्णाजी तुपट, फैजान पटेल उपस्थित हाेते.

130821\3814img-20210813-wa0090.jpg

उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी उपोषणकर्त्याला शरबत दिले .

Web Title: After the assurance, the corporator withdrew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.