आश्वासनानंतर शिक्षकाचे उपोषण सुटले
By Admin | Published: September 12, 2016 02:04 AM2016-09-12T02:04:28+5:302016-09-12T02:04:28+5:30
२५ सप्टेंबर २०११ पासून आजतागायतचे वेतन अदा न झाल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शिक्षक दिनापासून
गडचिरोली : २५ सप्टेंबर २०११ पासून आजतागायतचे वेतन अदा न झाल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शिक्षक दिनापासून उपोषणाला बसलेले वैरागड येथील शिक्षक योगेश दौलत नागापुरे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या आश्वासनानंतर गुरूवारी उपोषण सोडले.
वैरागडच्या शिवाजी विद्यालयातील सहायक शिक्षक योगेश दौलत नागपुरे यांनी वेतन आजतागायत न झाल्याच्या कारणावरून शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शिक्षक दिनापासून उपोषण सुरू केले होते. याबाबीची दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच शिवाजी विद्यालय वैरागडचे मुख्याध्यापक यांना कार्यवाही करण्याचे निर्देश पत्राद्वारे दिले. त्यामुळे नागपुरे यांनी उपोषण मागे घेतले. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) एन. एस. चावरे यांनी नागापुरे यांना लिंबूपाणी पाजले.
यावेळी विनोद पांढरे, साई कोंडावार, एन. व्ही. गवळी, संभाजी खेडेकर, दौलत नागपुरे, चोखाजी खोब्रागडे, मधुकर मुपीडवार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)