गडचिरोली जिल्ह्यातून ३७७१ मजुरांची तपासणी करून स्वगावी पाठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:46 PM2020-05-04T13:46:33+5:302020-05-04T13:46:54+5:30
जिल्ह्यातील तेरा हजार मजूर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडायला गेले होते. कोरोनाच्या संसर्गमुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. तीन महिन्यापासून तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शनिवार २ मेपासून जिल्ह्यात येणे सुरु झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील तेरा हजार मजूर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडायला गेले होते. कोरोनाच्या संसर्गमुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. तीन महिन्यापासून तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शनिवार २ मेपासून जिल्ह्यात येणे सुरु झाले. अजूनही मजुरांची संख्या वाढत आहे. त्या मजुरांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी ठिकाणचे मिळून ३७७१ मजुरांना स्वगावी पाठविण्यात आलेले आहे. आज आलेल्या मध्यप्रदेश राज्यातील ४४ मजुरांना त्यांची आरोग्य तपासणी करुन महामंडळच्या बसने दोन टप्प्यात सोडण्यात आले . आज सकाळी ७ वाजतापासून आरोग्य तपासणीला सुरवात झाली. ग्राम पंचायतीचे वतीने चेक पोस्ट येथे या परिसरात आलेल्या मजुरांच्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. मजुरांचे थवेच्याथवे घोळका करून बसले होते.