अथक परिश्रमानंतर चितळाला जिवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:42+5:302021-04-06T04:35:42+5:30
विहीरी लगत असलेल्या नागरिकांना चितळ विहिरीत पडल्याची माहिती मिळताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी गोन्नाडे यांना घटनेची माहीती दिली असता घटनास्थळी ...
विहीरी लगत असलेल्या नागरिकांना चितळ विहिरीत पडल्याची माहिती मिळताच त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी गोन्नाडे यांना घटनेची माहीती दिली असता घटनास्थळी बनरक्षक एस.पी. धानोरकर, वनरक्षक जगदीश मानकर, वनरक्षक सी.डी. कुमोटी, वनरक्षक शिवराम गुरुनुले, वनमजूर समीर गोमास्ता, संगणक ऑपरेटर अक्षय सोमनकर, अजय बुरांडे दाखल झाले. जवळच राहत असलेल्या नागरिकांच्या साहाय्याने खाटेला दोरखंड बांधून चितळाला विहिरीतून अर्धा तासाच्या अथक परिश्रमाने बाहेर काढण्यात आले. यावेळी सचिन साखरकर, महेंद्र मडावी, अशोक मेहता, विकास भंडारे, पी.के. कांबळे, हेमंत उपाध्ये, प्रतीक तुरे, शुभम शेंडे आदी नागरिकांनी सहकार्य केले. चितळ विहिरीतून बाहेर निघताच जंगलाकडे पळ काढला.