गोंडवाना विद्यापीठ निवडणुकीत अनेकांची मते झाली बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:56 PM2017-12-13T23:56:46+5:302017-12-13T23:57:03+5:30

गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि.१३ ला सुरू झाली. मात्र सायंकाळपर्यंत एकाही जागेचा निकाल जाहीर होऊ शकला नाही.

After many votes in Gondwana University elections | गोंडवाना विद्यापीठ निवडणुकीत अनेकांची मते झाली बाद

गोंडवाना विद्यापीठ निवडणुकीत अनेकांची मते झाली बाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि.१३ ला सुरू झाली. मात्र सायंकाळपर्यंत एकाही जागेचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. विशेष म्हणजे पसंतीक्रमानुसार मतदान करायचे असल्यामुळे बºयाच मतदारांची तारांबळ उडून त्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केले. त्यामुळे त्यांचे मत बाद ठरविण्यात आले.
विद्यापीठाची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे एकीकडे सर्व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना मतदानाप्रमाणेच मतमोजणीचेही काम धिक्या गतीने चालले. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या तमाम उमेदवारांसह त्यांच्यासोबत आलेल्या समर्थकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मध्यरात्रीपर्यंत मतमोजणीचे काम सुरूच होते.
उमेदवारांचे खाण्या-पिण्याचे हाल
ज्या ठिकाणी मतमोजणीचे काम सुरू होते ते शासकीय तंत्रनिकेतन गडचिरोली शहराच्या बाहेर आहे. त्या परिसरात सायंकाळनंतर खाण्यापिण्याचे साहित्यच नाही तर चहासुद्धा मिळत नव्हता. त्यामुळे रात्री उमेदवार व त्यांच्या समर्थकांना तीन किलोमीटरवर असलेल्या मुख्य शहरात यावे लागत होते. रात्री १० नंतर शहरातही काही मिळत नव्हते. विशेष म्हणजे रात्री थंडीत इमारतीबाहेर ताटकळत राहावे लागले.
निकालासाठी त्रिसदस्यीय समिती
अधिसभा, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळांचा निकाल जाहीर करण्यासाठी आणि निकालावर येणारे आक्षेप ऐकून घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. त्यात डॉ.मिलिंद बाराहाते, डॉ.सी.डी.देशमुख आणि डॉ.पोमावार यांचा समावेश असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक जुनघरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
७ टेबल, ९० कर्मचारी
या मतमोजणीसाठी एकूण ७ टेबल लावले होते. प्रत्यक्ष मतमोजणीपासून तर निकालाचे तक्ते तयार करणे व इतर कामांसाठी एकूण ९० कर्मचाºयांची नियुक्ती विद्यापीठ प्रशासनाने केली होती. मतमोजणीच्या हॉलसह इतर ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. कंट्रोल रुममधून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. तंत्रनिकेतनच्या तिसºया मजल्यावर मतमोजणी हॉल असल्यामुळे तारांबळ उडत होती.

Web Title: After many votes in Gondwana University elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.