पुन्हा ३५ एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:30+5:30
९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८३ झाली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी मागील २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. २० नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील राेजंदारी चालक कम वाहक असलेल्या १६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे, तर विभागीय कार्यालयात असलेल्या १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, यातून काेणताही ताेडगा निघाला नसल्याने, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तीनही आगारांतील जवळपास ५०० कर्मचारी संपावर आहेत. कामावर गैरहजर असल्याच्या कारणावरून २० नाेव्हेंबर राेजी ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे हाेणार हाल
- २२ नाेव्हेंबरपासून राज्यभरातील शाळा सुरू हाेत आहेत. गडचिराेली व अहेरी आगारातील एकूण बससंख्येच्या जवळपास निम्म्या बसेस मानव विकास मिशनच्या आहेत.
- बससेवा उपलब्ध असल्याने २० ते ३० किमी अंतरावर असलेल्या शाळेत मुला-मुलींना प्रवेश घेतला हाेता, तसेच इतर विद्यार्थ्यांनाही पास दिली जात हाेती. या पासमध्ये जवळपास ६५ टक्के सूट दिली जाते.
- मात्र, बससेवा बंद असल्याने एवढ्या दूरच्या शाळेत जायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमाेर निर्माण झाला आहे. त्यांचे यामुळे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
४८ कर्मचाऱ्यांवर यापूर्वी झाली कारवाई
९ नाेव्हेंबर राेजी गडचिराेली आगारातील तीन, अहेरी सहा व ब्रह्मपुरी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. १० नाेव्हेंबर राेजी ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले हाेते. अशा एकूण ४८ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली हाेती. आता एकूण कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८३ झाली आहे.
खासगी वाहतूक जाेरात
एसटीच्या फेऱ्या बंद असल्याचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलण्यास सुरुवात केली आहे. फारशी तिकीटवाढ केली नसली, तरी प्रवाशांना काेंबून भरले जात आहे. काही प्रवासी तर मागे लटकून प्रवास करीत आहेत. एसटीचा संप लवकर मिटावा, अशी अपेक्षा हाेत आहे.