माेबाईलच्या जमान्यात लँडलाईन, क्वाईनबाॅक्सची ट्रिंग ट्रिंग गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:41+5:302021-09-04T04:43:41+5:30
दूरसंचार सेवेचा उगम लँडलाईनच्या माध्यमातून झाला. प्रत्येकाच्या घरापर्यंत केबल पाेहाेचवून लँडलाईन फाेन सेवा पुरविली जात हाेती. काही दिवसांनी याच ...
दूरसंचार सेवेचा उगम लँडलाईनच्या माध्यमातून झाला. प्रत्येकाच्या घरापर्यंत केबल पाेहाेचवून लँडलाईन फाेन सेवा पुरविली जात हाेती. काही दिवसांनी याच केबलवरून इंटरनेट सेवाही पुरविण्यात येत हाेती. १० वर्षांपूर्वी जिल्ह्यात जवळपास सात हजार लँडलाईन फाेन हाेते. आता मात्र जेमतेम ७०० लँडलाईन शिल्लक राहिल्या आहेत. त्याही केवळ शासकीय कार्यालये, बॅंका, काही खासगी कार्यालये यांच्यामध्येच हे फाेन दिसून येतात.
माेबाईल कंपन्यांनी अनलिमिटेड व्हाॅइस पॅक सुरू केल्यापासून लँडलाईनला अवकळा आली आहे.
बाॅक्स
केवळ ७०० लँडलाईन
१० वर्षांपूर्वी जिल्ह्यात जवळपास सात हजार लँडलाईन हाेत्या. आता केवळ ७०० लँडलाईन शिल्लक आहेत. घरातून तर लँडलाईन गायबच झाली आहे. केवळ शासकीय कार्यालयांमध्येच लँडलाईन फाेन दिसून येतात. ग्रामीण भागातील नागरिकही आता माेबाईलचाच वापर करतात.
बाॅक्स
क्वाईनबाॅक्स तर गायबच
मध्यंतरीच्या काळात क्वाईनबाॅक्सची संकल्पना हाेती. शहरातील अनेक दुकानांत क्वाईनबाॅक्स राहत हाेत्या. या क्वाईनबाॅक्समध्ये एक रुपयाचे नाणे टाकून बाेलले जात हाेते. जेवढे अधिक बाेलायचे आहे, तेवढे एक रुपयाचे नाणे जवळ ठेवावे लागत हाेते. सेकंद कमी हाेताच नाणे टाकले जात हाेते. तेव्हाच फाेन सुरू राहत हाेता, तसेच काहीजण एसटीडीचा व्यवसायही चालवत हाेते. हे आता गायबच झाले आहेत.
बाॅक्स
ब्राॅडबँडऐवजी आता ओएफसी जाेडणी
इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी ब्राॅडबॅंड जाेडले जात हाेते. आता ब्राॅडबॅंडची जागा ओएफसी (ऑप्टिकल) केबलने घेतली आहे. ओएफसी केबल हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. यात स्पीड अधिक राहते. त्यामुळे बहुतांश कार्यालयांमध्ये आता ओएफसी केबलची जाेडणी घेतली जात आहे. जिल्ह्यात जवळपास चार हजार जाेडण्या आहेत.