अग्रवाल बंधूंनी केला २०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:32+5:302021-04-26T04:33:32+5:30

देसाईगंज : राज्यासह संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला आहे. ऑक्सिजनअभावी कित्येकांचे तडफडून जीव गेल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशातच ...

The Agrawal brothers supplied 200 oxygen cylinders | अग्रवाल बंधूंनी केला २०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा

अग्रवाल बंधूंनी केला २०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा

googlenewsNext

देसाईगंज : राज्यासह संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला आहे. ऑक्सिजनअभावी कित्येकांचे तडफडून जीव गेल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अशातच सामाजिक उत्तरदायित्व 下下下下下下निभवण्यात载载载载载载 सदैव अग्रेसर असलेले देसाईगंज येथील उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला 下下下下下下२००载载载载载载 ऑक्सिजन सिलिंडर 下下下下下下स्वत:कडून载载载载载载 उपलब्ध करून दिले आहेत.

काेराेनाने गंभीर स्थिती निर्माण झाल्यास संबंधित रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. मात्र गडचिराेली जिल्ह्यातही काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. 下ही载 बाब लक्षात घेऊन देसाईगंज येथील उद्याेगपती आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांनी ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्याचा निर्णय घेतला. नागपूर येथील खासगी कंपन्यांकडून 下下下下下下२००载载载载载载 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून 下下下下下下हे载载载载载载 सिलिंडर गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून येथील सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या 下या载 मौलिक कामगिरीमुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मोठीच मदत होणार आहे. त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

मागील वर्षी लाॅकडाऊनच्या कालावधीतही अग्रवाल बंधूंनी पायदळ परत जाणाऱ्या नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली हाेती. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएससी, बँक व इतर पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या 下या载 कार्याचे काैतुक हाेत आहे.

करण्यात मौलिक भूमिका बजावल्याने त्यांच्या या स्तुत्य कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात दि. २२ मार्च २०२०च्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन करण्यात आल्याने उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांची होरपळ होऊ लागली होती. दरम्यान, जिल्हा वाहतूक बंदी करण्यात आल्याने व रेल्वेगाड्याही बंद करण्यात आल्याने बेरोजगार ठरलेल्या रोजगारांनी हजारो किलोमीटर पायदळ चालत घर गाठण्यासाठी प्रयत्न चालवले होते. अशातच हातचा रोजगार हिरावल्याने शहरातील अनेक गोरगरिबांची एकवेळच्या अन्नावाचून होरपळ होऊ लागली होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते आकाश अग्रवाल यांच्या लक्षात येताच त्यांनी सकाळी चहानाश्त्यापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल तीन महिने कोणताही गाजावाजा न करता व कुठलाही राजकारणही आड न येऊ देता सेवाभावी वृत्तीने भोजनाची व्यवस्था करण्यात मौलिक भूमिका बजावली होती. देसाईगंज शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षेत भाग घेता यावा यासाठी आपली नैतिक जबाबदारी निभावत एमपीएससी, युपीएससी तसेच इतरही स्पर्धा परीक्षेची किमती पुस्तके येथील लायब्ररीत पुरवण्यात मौलिक भूमिका बजावली होती. यामुळे शहरातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी अभ्यास करताना अधिकच मौलिक मदत झाली असून याचा लाभ आजही शहरातील शेकडो उच्चशिक्षित घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजनचा तुडवटा निर्माण झाल्याने व यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येऊ लागल्याने उपचारादरम्यान स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेडसावत असलेली गंभीर समस्या लक्षात घेता उद्योगपती आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांनी .............???????

Web Title: The Agrawal brothers supplied 200 oxygen cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.