कामगारांच्या मागण्या मान्य; तब्बल सहा दिवसानंतर कचऱ्याची उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:39 AM2021-09-25T04:39:59+5:302021-09-25T04:39:59+5:30

एटापल्ली येथील सफाई कामगारांची मजुरी गेल्या दोन महिन्यांपासून थकीत होती. सफाई कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. वारंवार ...

Agree to workers' demands; Garbage collection after six days | कामगारांच्या मागण्या मान्य; तब्बल सहा दिवसानंतर कचऱ्याची उचल

कामगारांच्या मागण्या मान्य; तब्बल सहा दिवसानंतर कचऱ्याची उचल

Next

एटापल्ली येथील सफाई कामगारांची मजुरी गेल्या दोन महिन्यांपासून थकीत होती. सफाई कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. वारंवार संबंधित कंत्राटदाराशी फोनवर चर्चा करूनही कंत्राटदाराने लक्ष दिले नाही. अखेर सफाई कामगारांनी मजुरी मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. सहा दिवसांपासून कचरा रस्त्यावर पडला हाेता. कामगारांना मजुरी मिळावी यासाठी लाेकमत प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी तथा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शुभम गुप्ता यांना विचारणा केली असता यावर ताेडगा काढू, असे सांगून कंत्राटदाराशी चर्चा केली व ताेडगा काढला. भारतीय जनसंसद अध्यक्ष सचिन मोतकुरवार यांनीही पाठपुरावा केला. गुरुवारी कंत्राटदारासोबत फोनवर सकारात्मक चर्चा केली. यात त्यांनी थकीत मजुरी व वाढीव मजुरी देण्याचे मान्य केले. त्यामुळे कामगारांनी सफाईचे काम पूर्ववत सुरू केले.

Web Title: Agree to workers' demands; Garbage collection after six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.