कृषी केंद्र तीन दिवस राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:03 AM2017-11-02T00:03:26+5:302017-11-02T00:03:38+5:30
गडचिरोली डिस्ट्रीक्ट अॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली डिस्ट्रीक्ट अॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हधिकाºयांना निवेदन देऊन पूर्वसूचना दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशके फवारणी केल्यामुळे विषबाधा होऊन शेतकºयांचा मृत्यू झाला. यासाठी कृषी केंद्र चालकाच जबाबदार असल्याचा प्रचार केला जात आहे. कृषी केंद्र चालकांवर पोलीस कारवाई, विक्री परवाना रद्द करणे, विक्रीबंद आदेश देणे अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची कारवाई केली जात आहे. मात्र सदर कारवाई चुकीची असून अशा परिस्थितीत व्यवसाय करणे कठीण आहे. ज्या कृषी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. या मुख्य मागणीसाठी २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत कृषी केंद्र बंद ठेवले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना गडचिरोली डिस्ट्रिक्ट अॅग्रो डिलर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.