जीपीएसद्वारे शेतीची मोजणी सुरू

By admin | Published: June 14, 2014 11:34 PM2014-06-14T23:34:08+5:302014-06-14T23:34:08+5:30

गडचिरोली जिल्हा वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत देशात अग्रक्रमावर आहे. मात्र भामरागड व एटापल्ली तालुक्यात वैयक्तीक व सामुदायीक वनहक्क दाव्यांचे प्रकरण प्रलंबित होते. हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी

Agricultural counting started by GPS | जीपीएसद्वारे शेतीची मोजणी सुरू

जीपीएसद्वारे शेतीची मोजणी सुरू

Next

एटापल्ली : गडचिरोली जिल्हा वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत देशात अग्रक्रमावर आहे. मात्र भामरागड व एटापल्ली तालुक्यात वैयक्तीक व सामुदायीक वनहक्क दाव्यांचे प्रकरण प्रलंबित होते. हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी सध्या जीपीएसद्वारे शेतीच्या मोजणी कामाला सुरूवात झाली आहे. या प्रश्नाला घेऊन जनहितवादी युवा समितीने या भागात मोठा लढा आदिवासींना घेऊन उभारला होता.
सन २००८-०९ पासून एटापल्ली व भामरागड तालुक्यात वैयक्तीक तसेच सामुदायीक वनहक्काचे दावे निकाली काढण्यात आले नव्हते. ते प्रलंबित होते. या प्रकरणी या भागातील शेकडो आदिवासींनी रस्ता रोको आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. उपोषणसुध्दा केले होते. त्यानंतर संबंधित प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी व अन्य जबाबदार अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर आता जीपीएसद्वारे शेतमोजणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत एटापल्ली तालुक्यात ७ शेतांची, जागांची मोजणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मोजणी कार्यक्रमात महसूल, वन विभागाचे अधिकारी तसेच तलाठी व्ही. आर. कुमरे, क्षेत्र सहाय्यक एम. टी. गोंडाणे, वनरक्षक एस. एम. किरमे, आनंद अमरकृष्ण विश्वास, राजेय्या गुरालवार, पी. एल. वाढई, पांडुरंग गुरनुले, रमेश उलीवार, उलीवार आदी उपस्थित आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Agricultural counting started by GPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.