हेडरी येथे कृषी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:25 AM2021-07-11T04:25:22+5:302021-07-11T04:25:22+5:30
सदर कार्यक्रमास उपविभागीय पाेलीस अधिकारी संकेत गोसावी, सीआरपीएफचे सहायक कमांडंट पटेल, कृषी अधिकारी माने, तालुका कृषी अधिकारी दमाने, पशुवैद्यकीय ...
सदर कार्यक्रमास उपविभागीय पाेलीस अधिकारी संकेत गोसावी, सीआरपीएफचे सहायक कमांडंट पटेल, कृषी अधिकारी माने, तालुका कृषी अधिकारी दमाने, पशुवैद्यकीय अधिकारी सुरमवार, त्रिपुरवार, प्रभारी अधिकारी सुकाळे, सरपंच अरुणा सडमेक, उपसरपंच राकेश कवडो, पुरसलगोंदी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तसेच पोलीस मदत केंद्र हेडरी हद्दीतील सर्व गावपाटील व ३५० ते ४०० च्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना पोलीस मदत केंद्र हेडरीच्या वतीने ४०० बांबू, ५५० शेवग्याची झाडे यांचे वाटप करण्यात आले. सदर वेळी उपस्थित विभागप्रमुखांनी शासनाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
३० नागरिकांना आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड ११, ३८ पॅनकार्ड काढून देण्यात आली. तसेच १०५ जॉबकार्डचे वाटप केले. नवीन २५ जॉबकार्ड प्रस्ताव तयार करण्यात आले. ५० टक्के अनुदानावर धान बियाणेकरिता १९ प्रस्ताव घेण्यात आले.