अर्ध्या रात्री सुरू करावा लागताे कृषिपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:00 AM2020-11-28T05:00:00+5:302020-11-28T05:00:23+5:30

दिवसेंदिवस कृषिपंपांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात वीज निर्मिती हाेते. कृषिपंपांना अविरत वीज पुरवठा करायचे म्हटल्यास घरगुती, उद्याेग व वाणिज्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राहकांना भारनियमन करावे लागणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषिपंपांसाठी स्वतंत्र फिडर आहे, अशा विद्युत लाईनवर सुमारे १४ ते १६ तासांचे भारनियमन केले जाते. शासनाने कृषिपंपांसाठी भारनियमनाचा वेळापत्रकही ठरवून दिला आहे. 

The agricultural pump has to be started at midnight | अर्ध्या रात्री सुरू करावा लागताे कृषिपंप

अर्ध्या रात्री सुरू करावा लागताे कृषिपंप

Next
ठळक मुद्देकृषी विद्युत लाईनवर १६ तासांचे भारनियमन : कुरखेडा तालुक्यातील पिके धाेक्यात

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने शेड्यूल्ड ठरवून दिले आहे. त्यानुसार दुसऱ्या व चवथ्या आठवड्यात रात्री १२ वाजतापासून सकाळी १० वाजेपर्यंतच वीज पुरवठा केला जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या रात्री शेतावर जाऊन वीज पुरवठा सुरू करावा लागते. हे काम जीवावर बेतणारे आहे. मात्र पाेटासाठी जीवावर उदार हाेऊन रात्री शेत गाठावे लागते.  
खरीप पिके निघल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी रबी हंगामात भाजीपाला, कडधान्य, उन्हाळी धानपीक व मका पिकाची लागवड करतात. यातील उन्हाळी धानपिकाला माेठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. डिझेल इंजिन परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंप खरेदी केलेे आहेत.
दिवसेंदिवस कृषिपंपांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात वीज निर्मिती हाेते. कृषिपंपांना अविरत वीज पुरवठा करायचे म्हटल्यास घरगुती, उद्याेग व वाणिज्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राहकांना भारनियमन करावे लागणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कृषिपंपांसाठी स्वतंत्र फिडर आहे, अशा विद्युत लाईनवर सुमारे १४ ते १६ तासांचे भारनियमन केले जाते. शासनाने कृषिपंपांसाठी भारनियमनाचा वेळापत्रकही ठरवून दिला आहे. 
पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा राहते. तर दुसऱ्या व चवथ्या आठवड्यात रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत वीज पुरवठा राहते. रात्री १२ वाजता विद्युत पुरवठा सुरू हाेत असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेत गाठून पम्प सुरू करावे लागते. अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागून आहेत. रात्री जंगलाकडे जाताना किंवा घराकडे परत येताना जंगली जनावरांचा हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा सुरू असणे गरजेचे आहे. 

रात्री १२ वाजता कृषिपंप सुरू करण्यासाठी शेतावर जावे लागते. हे काम धाेक्याचे आहे. मात्र शेतीवरच आपले पाेट असल्याने जीव धाेक्यात घालून जावे लागते. कृषिपंपांना सुद्धा उद्याेगाप्रमाणेच नियमित वीज पुरवठा करावा.  
- किशाेर दर्राे, शेतकरी

पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणी

यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला. तसेच शेवटपर्यंत पाऊस पडल्याने नदी, नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. यातून उन्हाळी व रबी पिके घेणे शक्य आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकांच्या मशागतीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी पेरणी आटाेपली आहे.

कुरखेडा तालुक्यात प्रामुख्याने उन्हाळी धानपीक व मका पिकाची लागवड केली जाते. मका पिकाच्या तुलनेत धानपिकाला अधिक प्रमाणात पाणी लागत असल्याने शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे. दरवर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसते. 

कुरखेडा तालुक्यात स्वतंत्र विद्युत लाईन
कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा, चिखली, गुरनाेली या फिडरवरून वीज पुरवठा हाेणाऱ्या कृषी पंपांसाठी स्वतंत्र विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. या तीन फिडरअंतर्गत खेडेगाव, आंधळी, नवरगाव, बेलगाव, अंजनटाेला, अरतताेंडी, देऊळगाव, खरमतटाेला, शिरपूर या गावांचा समावेश आहे. या भागामध्ये जवळपास १ हजार ३०० कृषिपंप आहेत. स्वतंत्र लाईन असल्याने या ठिकाणी भारनियमन केले जाते. मात्र स्वतंत्र लाईन नसलेल्या ठिकाणी मात्र रात्रंदिवस वीज पुरवठा सुरू राहते, हे विशेष. 

भारनियमनाचे वेळापत्रक शासन व महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयाने ठरवून दिले आहे. त्याप्रमाणे गेवर्धा, गुरनाेली व चिखली फिडरवर भारनियमन केले जात आहे. भारनियमन बंद करण्याची कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी असली तरी शासनाचे निर्देश आपण टाळू शकत नाही.   
- मिथीन मुरकुटे, उपविभागीय अभियंता, कुरखेडा

Web Title: The agricultural pump has to be started at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.