आष्टा येथे कृषी संजीवनी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:25 AM2021-06-26T04:25:22+5:302021-06-26T04:25:22+5:30
याप्रसंगी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी जी. एन. जाधवर यांनी आपल्या मार्गदर्शनातून खते चिखलणीच्या वेळी चिखलाच्या आत जाईल, अशा पद्धतीने ...
याप्रसंगी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी जी. एन. जाधवर यांनी आपल्या मार्गदर्शनातून खते चिखलणीच्या वेळी चिखलाच्या आत जाईल, अशा पद्धतीने खते द्यावी. त्यामुळे ती पिकांना मुळावाटे शोषून घेण्यास उपयुक्त ठरतील. दिवसेंदिवस खताच्या किमती वाढत असल्यामुळे वापरलेल्या खताचा पिकांना उपयोग होणे गरजेचे आहे. चिखलणी पूर्वी खते गाडल्यामुळे खताचा अपव्यय होणार नाही. खताची बचत होईल आणि शेत जमिनीचे नुकसान पण होणार नाही. खते चिखलणी पूर्वीच टाकण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी यांनी केले. कृषी पर्यवेक्षक ए.आर. हुकरे यांनी तुरीचे शेंडे खुडणे याचे तसेच दहा टक्के खत बचतीचे प्रात्यक्षिकातून उदाहरण देऊन शेतकऱ्यांना पटवून दिले. प्रास्ताविक कृषी सहाय्यक डी. एल. चौधरी यांनी तर आभार कु. डी. के. क्षीरसागर यांनी मानले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. उमेदचे चेतन राऊत यांचे सहकार्य लाभले.